जाहिरात

VIDEO: राष्ट्रपती भवनातील 'त्या' बॉडीगार्डला पुतीन आयुष्यभर लक्षात राहतील; व्हिडीओची जगभरात होतेय चर्चा

एका जागतिक नेत्याने दुसऱ्या देशात जाऊन अशाप्रकारे सुरक्षा कर्मचाऱ्याला आदर देणे, ही बाब अत्यंत खास मानली जात आहे. पुतिन यांच्या या समानतेच्या भावनेमुळे त्यांचे जगभर कौतुक होत आहे.

VIDEO: राष्ट्रपती भवनातील 'त्या' बॉडीगार्डला पुतीन आयुष्यभर लक्षात राहतील; व्हिडीओची जगभरात होतेय चर्चा
Putin India Tour
  • रूस के राष्ट्रपति पुतिन के लिए राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति मुर्मू ने डिनर का आयोजन किया था.
  • पुतिन ने राष्ट्रपति भवन पहुंचते ही अंगरक्षक से गर्मजोशी से हाथ मिलाकर सभी का ध्यान अपनी ओर आकर्षित किया.
  • पुतिन का यह सहज और सम्मानपूर्ण व्यवहार पहले भी देखा गया है, जो उनको दूसरे नेताओं से अलग बनाता है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौरा संपवून मॉस्कोला रवाना झाले असले, तरी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पुतिन यांच्या सन्मानार्थ दिलेल्या डिनरसाठी ते पोहोचले. तिथे त्यांच्या साध्या अंदाजची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचे कारण

व्लादिमीर पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: बाहेर आले होते. कारमधून उतरताच पुतिन यांनी सर्वात आधी स्वागतासाठी तिथे उपस्थित असलेल्या अंगरक्षकाशी हस्तांदोलन केले. काही सेकंदांपर्यंत त्यांनी अंगरक्षकाशी अत्यंत उत्साहपूर्ण पद्धतीने हात मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींना भेटले.

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

एका जागतिक नेत्याने दुसऱ्या देशात जाऊन अशाप्रकारे सुरक्षा कर्मचाऱ्याला आदर देणे, ही बाब अत्यंत खास मानली जात आहे. पुतिन यांच्या या समानतेच्या भावनेमुळे त्यांचे जगभर कौतुक होत आहे.

पुतिन यांचा खास स्वभाव

पुतिन यांनी अशा प्रकारची कृती पहिल्यांदाच केली नाही. यापूर्वीही मॉस्कोमध्ये ते अनेकदा आपल्या अंगरक्षकांशी अत्यंत सहजपणे बोलताना दिसले आहेत. पण, दुसऱ्या देशात जाऊन इतकी उदारता दाखवणे त्यांना जगातील इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवते. या कृतीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, पुतिन यांच्या मनात प्रत्येक व्यक्तीबद्दल आदरभाव आहे.

गार्ड ऑफ ऑनर

या भेटीदरम्यान पुतिन यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. याप्रसंगी, तिन्ही सेनांच्या संयुक्त तुकड्यांनी रशियन अध्यक्षांना सैनिकी सन्मान केला. पुतिन यांचा हा साधेपणा त्यांच्या भारत दौऱ्यातील राजनैतिक चर्चांइतकाच प्रभावी ठरला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com