जाहिरात

Sunjay Kapur: 'कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाब... संजय कपूरच्या आईच्या पत्रानं खळबळ!

Sunjay Kapur: 'कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाब... संजय कपूरच्या आईच्या पत्रानं खळबळ!
Sunjay Kapur: संजय कपूर यांचे 12 जून रोजी निधन झाले.
मुंबई:

Sunjay Kapur Family : अभिनेत्री  करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला वाद आणखी चिघळला आहे. संजय कपूर यांच्या कुटुंबात नवं कौटुंबीक नाट्य समोर आलं आहे. संजय कपूरच्या आई राणी कपूर यांनी  वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) निलंबित करण्याची मागणी केली आहे. AGM च्या अनेक प्रस्तावांमध्ये काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या नियुक्तीचा एक प्रस्ताव देखील आहे. राणी कपूर यांनी Sona BLW Precision Forging Limited च्या 25 जुलैच्या AGM ला दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याची मागणी केलीय. 

राणी कपूर यांनी पत्रात आपणच कपूर कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर संचालकांच्या नियुक्तीसाठी जबरदस्ती, कागदपत्रांचा गैरवापर आणि बेकायदेशीर पाऊले उचलल्याचा आरोप त्यांनी केलाय. राणी यांनी हे पत्र बोर्ड, भागधारकांना पाठवण्यासोबतच बाजार नियामक SEBI ला देखील पाठवले आहे. त्यांच्या या कृतीमुळे प्रमोटर्समधी संघर्ष आणखी चिघळला असून  Sona BLW च्या शेअर्समध्ये 2.6 टक्के घट झाली आहे.

( नक्की वाचा : Sunjay Kapur : संजय कपूरचा शेवटचा Video Viral, मृत्यूपूर्वीचे शेवटचे क्षण पाहून उडेल थरकाप )
 

राणी कपूर यांनी पत्रात लिहिले आहे की, 'मी पुन्हा सांगू इच्छिते की, माझ्या दिवंगत पतीने सोडलेल्या इच्छापत्राच्या आधारावर, मी कंपनीतील बहुसंख्य भागधारक आहे. त्यामुळे कंपनी/Sona Group मध्ये कुटुंबाच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव जबाबदार व्यक्ती मीच आहे.'

संजय कपूरच्या कुटुंबात कोण?

कपूर कुटुंबातील हा वाद 12 जून रोजी संजय कपूर यांच्या निधनानंतर समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक संजय कपूर यांचं ब्रिटनमध्ये पोलो खेळताना ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. संजय कपूर यांचे यापूर्वी नंदिता महतानी आणि नंतर अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी लग्न झाले होते. 2016 मध्ये करिश्मा कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर 2017 मध्ये प्रिया सचदेव यांच्याशी त्यांनी तिसरे लग्न केले होते. करिश्मा कपूरसोबतच्या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी समायराचा जन्म 2005 मध्ये झाला आणि मुलगा कियान राज कपूरचा जन्म 2010 मध्ये झाला होता. याव्यतिरिक्त त्यांचे भाऊ-बहीण मंदि कपूर आणि सुपर्णा मोटवानी देखील आहेत.

( नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )

राणी कपूर यांनी सांगितले की,  'मुलाच्या निधनाच्या दुःखात असताना त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला गेला आणि कोणतीही स्पष्टीकरण न देता त्यांना कागदपत्रांवर सह्या करण्यास दबाव टाकला गेला.' बँक खाती आणि कंपनीची महत्त्वपूर्ण माहिती देखील त्यांना दिली नसल्याचा दावा त्यांनी केला. कठीण काळात ज्या कागदपत्रांवर त्यांनी सह्या केल्या, आता त्यांचा गैरवापर केला जात आहे.

शुक्रवारच्या AGM च्या अजेंड्यामध्ये एक प्रस्ताव बोर्डमध्ये संचालकांच्या नियुक्तीशी देखील संबंधित आहे. पण, या प्रकरणाचा आपला काहीही संबंध नाही. आपल्या परवानगीशिवाय ही सूचना देण्यात आल्याचा दावा राणी कपूर यांनी केलाय. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com