जाहिरात

पंजाबमध्ये सुखवीर बादल यांच्यावर गोळीबार! सुवर्ण मंदिरासमोर जीवघेणा हल्ला; थरारक VIDEO

अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले असून हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले आहे

पंजाबमध्ये सुखवीर बादल यांच्यावर गोळीबार! सुवर्ण मंदिरासमोर जीवघेणा हल्ला; थरारक VIDEO

पंजाब: पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग ूबादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले असून हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या बाहेर ही धक्कादायक घटना घडली. सध्या सुखबीरसिंग बादल हे त्याठिकाणी रक्षक म्हणून काम करत आहेत. बादल धार्मिक शिक्षा भोगत असून आज त्यांच्या शिक्षेचा दुसरा दिवस आहे.

नक्की वाचा: पहाटे पहाटे जमीन हादरली! गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. ही घटना घडली तेव्हा तेथे अनेक लोक उपस्थित होते. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. नारायण सिंह चौरा असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो खलिस्तानी समर्थक असून दल खालसाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

शीख धर्मगुरूंनी 'टंकह' (धार्मिक शिक्षा) उच्चारल्यानंतर  अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी काल सुवर्ण मंदिराबाहेर 'सेवादार' म्हणून काम केले. आज त्यांच्या कामाचा दुसरा दिवस होता. काल बादल सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर व्हीलचेअरवर, एका हातात भाला धरून, निळा 'सेवादार' गणवेश परिधान करून शिक्षा भोगत होते. त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले असून ते व्हीलचेअरचा वापर करत आहेत.

महत्वाची बातमी: भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का होणार? 5 महत्त्वाची कारणं

Listen to the latest songs, only on JioSaavn.com