
Employee Dies 10 Minutes After Texting For Sick Leave: मृत्यू कधी कसा अन् कोणत्या रुपात येईल हे काही सांगता येत नाही. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा असं सांगितले जाते. मृत्यू अन् आयुष्य किती अनिश्चित आहे याचीच प्रचिती देणारी एक दुख:द घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय तरुणाचा त्याच्या बॉसला (Manager) सुट्टीसाठी मेसेज (Message) पाठवल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्यू झाला. 13 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या या घटनेने त्याचे सहकारी आणि कुटुंबीय (Family) दु:खात बुडाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शंकर (Shankar) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या व्यवस्थापक (Manager) के.व्ही. अय्यर (KV Iyyer) यांनी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना सोशल मीडियावरुन सांगितली आहे. शंकर गेल्या 6 वर्षांपासून कंपनीत काम करत होता. तो विवाहित असून, त्याला एक लहान मूल आहे. त्याला दारू (Alcohol) किंवा धूम्रपान (Smoking) करण्याची सवय नव्हती.
Google Gemini Trend: ट्रेंडिंग इमेज बनवताना अडचण येतेय? गुगलच्या पॉलिसीत मोठा बदल, चेक करा
पाठीच्या दुखण्याला हलक्यात घेऊ नका (Dont Ignore Back Pain Issue)
3 सप्टेंबर 2025 सकाळी 8:37 वाजता शंकरने आपल्या व्यवस्थापकाला पाठीच्या तीव्र दुखण्यामुळे (Intense Back Pain) सुट्टीसाठी मेसेज केला. व्यवस्थापकाने 'ओके, आराम कर' असे उत्तर दिले. मात्र, दुर्दैवाने, अवघ्या 10 मिनिटांनी सकाळी 8:47 वाजता, शंकरला घरात असतानाच जीवघेणा हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी 11 वाजता अय्यर यांना एका फोन कॉलवरून शंकरच्या मृत्यूची बातमी मिळाली. सुरुवातीला त्यांचा यावर विश्वास बसला नाही, परंतु दुसऱ्या सहकाऱ्याकडून खात्री झाल्यावर ते तातडीने शंकरच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना ही बातमी खरी असल्याचे समजले. अय्यर यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर (Social Media) व्यक्त केल्या, ज्यामुळे ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
DEVASTATING INCIDENT WHICH HAPPENED TODAY MORNING :-
— KV Iyyer - BHARAT 🇮🇳🇮🇱 (@BanCheneProduct) September 13, 2025
One of my colleague, Shankar texted me today morning at 8.37 am with a message
"Sir, due to heavy backpain I am unable to come today. So please grant me leave." Such type of leave requests, being usual, I replied "Ok take…
Sangli Crime: सांगलीत स्पेशल 26! तोतया अधिकारी, खोटी IT रेड अन् कोट्यवधींची लूट, कसा घडला थरार?
लपलेली आरोग्य संकटे
या घटनेने ऑनलाइन समुदायामध्ये लपलेल्या आरोग्य धोक्यांवर मोठी चर्चा (Discussion) सुरू केली आहे. अनेकांनी म्हटले आहे की, हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे, जसे की पाठीत दुखणे, थकवा, घाम येणे आणि मळमळ होणे, अनेकदा सामान्य पोटदुखी (Gastric Issues) किंवा स्नायूंचा ताण (Strain) मानून दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. एका वापरकर्त्याने त्याच्या 40 वर्षीय मित्राबद्दल सांगितले, ज्याने डाव्या खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला अपचन (Indigestion) समजले, ज्यामुळे त्याचाही दुर्दैवी अंत झाला. तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्या 60 ते 90 मिनिटांत वैद्यकीय मदत मिळाल्यास जगण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे अशा लक्षणांबद्दल जागरूकता (Awareness) असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world