जाहिरात

वाह रे वाह! Google मध्ये नोकरी मिळाली, पोरानं आईला थेट अमेरिकेला नेलं अन् ऑफिसमध्ये..हृदयस्पर्शी Video पाहाच

Son And Mother Heart Touching Video Viral :  जागतिक पातळीवर आपल्या मुलांचं करिअर सुरु व्हावं आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावं, यासाठी आई-वडील काबाडकष्ट करतात. पण हीच मुलं जेव्हा यशाचं उंच शिखर गाठतात, तेव्हा..

वाह रे वाह! Google मध्ये नोकरी मिळाली, पोरानं आईला थेट अमेरिकेला नेलं अन् ऑफिसमध्ये..हृदयस्पर्शी Video पाहाच
Son And Mother Heart Touching Video
मुंबई:

Son And Mother Heart Touching Video Viral :  जागतिक पातळीवर आपल्या मुलांचं करिअर सुरु व्हावं आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावं, यासाठी आई-वडील काबाडकष्ट करतात. पण हीच मुलं जेव्हा यशाचं उंच शिखर गाठतात, तेव्हा मात्र त्यांच्या पालकांच्या आनंदाला पारावरच उरत नाही. मुलांना उच्चभ्रू कंपनीत नोकरी मिळाव्यावर त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणीत होतो. पण एका मुलानं त्याच्या आईसाठी असं काही केलं, जे पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका मुलाचं स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या आईला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गुगलच्या ऑफिसमध्ये नेलं, जिथे तो मुलगा नोकरी करतो. हा आनंदाचा क्षण मुलाने कॅमेरात कैद करून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 

पोराला गुगलच्या ऑफिसमध्ये काम करताना पाहिलं अन् आई खुश झाली

अभिजय अरोरा वुय्यरू, असं या मुलाचं नाव असून तो गुगल कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर आहे. या मुलानं त्याच्या आईला सॅन फ्रान्सिस्को येथे असलेल्या गुगल ऑफिसमध्ये नेलं. मुलाचं मोठं ऑफिस पाहून त्याच्या आईला खूप आनंद झाला. तिने या ऑफिसमध्ये फेरफटका मारला आणि तेथील वातावरणाचा आनंद लुटला. हे सर्व क्षण त्या मुलानं कॅमेरात टीपले आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केला. 

नक्की वाचा >>मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'No Traffic Jam', 'या' ठिकाणी होणार नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मोठा बोगदा?

व्हिडीओत पाहू शकता की, ते दोघेही कॅन्टिनमध्ये एकत्रित जेवण करतात. अभिजयने हा व्हिडीओ फक्त शेअरच केला नाही, तर त्याने आईसाठी हृदयस्पर्शी नोटही लिहिली. त्याने लिहिलं,मी या दिवसाला कधीच विसरणार नाही. आज मी माझ्या आईला माझं ऑफिस दाखवलं. मी आईला गूगल सॅन फ्रान्सिस्कोच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलो. त्याने पुढे म्हटलं, त्याची आई नेहमीच त्याच्यासाठी प्रेरणास्थान आहे. ती नेहमी माझ्यासोबत राहते. तिने माझ्यासाठी सर्वकाही त्यागलं आहे. प्रत्येक चांगल्या वाईट क्षणी ती मला साथ देते. दरम्यान, या व्हिडीओला लोकांनी खूप पसंत केलं आहे. यूजर्सने कमेंट्स करून मुलाचं कौतुकही केलं आहे.  

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ @abhijayaarora नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लोकांनी अभिजयचं कौतुक करत म्हटलंय की, आईसाठी जो दिवस खास बनवला,तो क्षण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. एका अन्य यूजरने म्हटलं, कुटुंबासोबत कामाचं यश शेअर करणं खूप अनमोल असतं. आईला तुझ्यावर खूप अभिमान असेल, असंही एकाने म्हटलं. 

नक्की वाचा >> 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com