जाहिरात

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'No Traffic Jam', 'या' ठिकाणी होणार नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मोठा बोगदा?

Navi Mumbai International Airport Latest News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी, या विमानतळाला लोकेनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'No Traffic Jam', 'या' ठिकाणी होणार नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मोठा बोगदा?
Navi Mumbai International Airport
मुंबई:

Navi Mumbai International Airport Latest News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी, या विमानतळाला लोकेनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. या विमानतळावर वाहतूक सेवा नोव्हेंबर महिन्यातच सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आज एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई विमानतळ हे मुंबईला बोगद्याने जोडता येईल का? मुंबईच्या बीकेसीपासून नवी मुंबई विमानतळ बोगद्याने कनेक्ट होईल का? याची व्यवहार्यता तपासून विस्तृत अहवाल सादर करण्याच्या सूचना शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

मुंबईतील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार

मिळालेल्या माहितीनुसार, आज एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना,महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला दोन कोटी इतकी असणार आहे. या विमानतळावर येण्यासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक असणार आहे. सध्या जे मार्ग आहेत, ते अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नवी मुंबई विमानतळावर विमानांची वाहतूक वाढणार आहे.

हे ही वाचा >> सावधान! ठाणे शहाराला डासांचा विळखा, डेंग्यू 405 , मलेरियाच्या 621 रुग्णांची नोंद, डॉक्टरांनी केलं मोठं आवाहन

हे विमानतळ राष्ट्रीय महामार्ग,उपनगरीय रेल्वे,मेट्रो,जलवाहतूक नेटवर्कसोबत जोडणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचा सी लिंक,बीकेसी ते नवी मुंबई विमानतळ असा बोगदा करता येतो का? याची चाचपणी करण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर आयुक्तांना सांगितलं आहे. त्यासाठी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे,एकूणच भू व सागरीय वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त कसा ठरेल, ते अभ्यासण्यासाठी तसेच एकूणच आरेखनासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 

हे ही वाचा >> 36 पैकी 36 गुण! DJ वाजताच नवरा-नवरीनं वरात गाजवली..पाहुण्यांसमोरच वेड्यासारखे नाचले, Video पाहून लोटपोट व्हाल 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com