जाहिरात

Thrilling video: टायरमध्ये भरत होता हवा, अचानक स्फोट झाला, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

अब्दुल राजीद याचे उडुपी इथं गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये शाळेची बस दुरुस्तीसाठी आली होती. याबसचा टायर पंचर झाला होता.

Thrilling video: टायरमध्ये भरत होता हवा, अचानक स्फोट झाला, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
उडुपी:

कर्नाटकच्या उडुपी इथला एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एक मॅकेनिक बसच्या एका टायरची दुरुस्ती करत होता. त्याच वेळी या टायर अचानक फुटला. त्या टायरचा मोठा स्फोट झाला. तो इतका भयंकर होता की टायर दुरुस्त करणारा मॅकेनिक अक्षरश: हवेत उडाला. हा अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अब्दुस राजीद असं त्या मॅकेनिकचे नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अब्दुल राजीद याचे उडुपी इथं गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये शाळेची बस दुरुस्तीसाठी आली होती. याबसचा टायर पंचर झाला होता. त्याचे काम अब्दुल करत होता. काम करत असताना तो त्या टायरवर बसला होता. त्याच वेळी टायरचा अचानक ब्लास्ट झाला. अब्दुलला काही कळायचा आत तो किती तरी फुट उंच हवेत उडाला. ही घटना एका चित्रीत झाली आहे. हा व्हिडीओ पहाताना काळजाचा ठोका नक्कीच चुकतो.     

ट्रेंडिंग बातमी - Crime News: आधी 15 लाख मागितले, मग बॉस सोबत शरीरसंबध ठेवायला सांगितले, पुढे मात्र...

या घटनेत अब्दुल हा अनेक फुट उंच हवेत उडाला. त्यानंतर तो जोरदार जमिनीवर आपटला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तिथे असलेल्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवलं आहे. त्यात त्याला अनेक जखमा झाल्या आहेत. शिवाय त्याच्या हाताचे हाडही तुटले आहे. 21 डिसेंबरला ही घटना घडली. त्याच्यावर उडुपी इथं उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अब्दुल हादरून गेला आहे. अनेक वर्ष तो हे गॅरेज चालवत आहे. मात्र अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: