जाहिरात

UP Crime News : प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; नवऱ्याने बायकोच्या नाकाचा लचकाच तोडला

UP Crime News : रक्तबंबाळ झालेल्या महिलेला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची स्थिती पाहून डॉक्टरांनी तिला ताबडतोब लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले.

UP Crime News : प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; नवऱ्याने बायकोच्या नाकाचा लचकाच तोडला

UP Crime News : नवऱ्याने बायकोच्या नाकाला चावा घेतल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात घडली आहे. बायको प्रियकराला भेटायला गेल्याने संतापलेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांना नवऱ्याला ताब्यात घेतलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमात वेडी झालेली एक महिला तिच्या प्रियकराच्या घरी त्याला भेटण्यासाठी गेली होती. मात्र पतीला संशय आल्याने त्याने तिचा पाठलाग केला. प्रियकराच्या घरी पोहोचल्यानंतर नवऱ्यांना बायको आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहून संतापलेल्या नवऱ्याने तिच्या नाकाला जोरदार चावा घेतला. 

(नक्की वाचा- Raja Raghuvanshi Case: 25 दिवसात 240 कॉल करणारा संजय वर्मा कोण? शातिर सोनमचा कट उघडकीस)

रक्तबंबाळ झालेल्या महिलेला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची स्थिती पाहून डॉक्टरांनी तिला ताबडतोब लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. 

( नक्की वाचा : Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं? )

जखमी महिलेचे म्हणणे आहे की तिच्या सासरच्या लोकांनी आणि कुटुंबियांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यातून सुटण्यासाठी ती तिचा प्रियकर सुशीलच्या घरी पोहोचली होती. पण सुशीलच्या भावाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना तिथे बोलावून घेतले. 

सुशील तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण संधी मिळताच त्याने तिच्या नाकावर हल्ला केला. महिलेचे म्हणणे आहे की ती गेल्या 10 महिन्यांपासून सुशीलवर प्रेम करत आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com