
Aligarh News : गेल्या काही दिवसांपासून अलिगढमधील प्रेमप्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सासू आणि जावयाच्या या लव्हस्टोरीमध्ये अनेकांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण दोघंही एकमेकांना सोडायला तयार नाही. कुटुंबालाच काय तर समाजाला अंगावर घेण्याची दोघांचीही तयारी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल आपल्या गावी आल्यानंतर कुटुंबासह गावकऱ्यांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे कुटुंबीयांनी हे प्रकरण राहुलवर सोडून दिलं. इथपर्यंत तर सर्व ठीक होतं. मात्र आता या प्रेम प्रकरणात खलनायकाची एन्ट्री झाली आहे. जो बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत आहे. या प्रकरणात जावयाच्या कुटुंबीयांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी जीवे मारण्याची नाही तर बॉम्बने उडवून देण्याची आहे. इतकच नाही तर गावाच्या सरपंचाचा जीव घेण्याची धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे गावकरी टेन्शनमध्ये आहेत. या प्रकरणात राहुलचे वडील ओमवीर सिंह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नक्की वाचा - निळ्या ड्रमनंतर सुटकेस कांड ! मामीनं भाच्यासोबत नवऱ्याचे तुकडे केले, वाचून येईल अंगावर काटा
सासू-जावयाची लव्ह स्टोरी
उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका लग्नघरात नवरदेव होणाऱ्या सासूसोबत पळून गेल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. 6 एप्रिलला ते दोघे ही घरातून पळून गेले. सपना आणि राहुल आधी अलिगडवरून कासगंज इथं पळाले. तिथून त्यांनी बरेली गाठली. तिथे त्यांनी मौजमजा केली. शहर फिरले. शेवटी त्यांनी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे ते जावून राहू लागले. प्रेमात आंधळे झालेले सपना आणि राहुलने जेव्हा त्यांचा मोबाईल सुरु केला त्यावेळी त्यांचे डोळे उघडले. मोबाईलवर फक्त आणि फक्त त्यांच्याच बातम्या होत्या. युपी पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक न्यूज चॅनेल आणि वर्तमान पत्रात त्यांच्याच बातम्या होत्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world