जाहिरात

Waqf Amendment Bill: शिवरायांची कविता, गांधीजींचे भजन.. वक्फ विधेयकावरुन निलेश लंकेंची सडेतोड भूमिका

Waqf Amendment Bill LIVE Updates: या विधेयकामध्ये वक्फ बोर्डाला सशक्त करण्याच्या नावाखाली त्याची जमीन हडपण्याचा डाव दिसतो आहे. त्यामुळे मला काही सूचना करायच्या आहेत," अशी मागणीही निलेश लंके यांनी केले. 

Waqf Amendment Bill: शिवरायांची कविता, गांधीजींचे भजन.. वक्फ विधेयकावरुन निलेश लंकेंची सडेतोड भूमिका

Waqf Amendment Bill LIVE Updates: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये आज केंद्रिय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. या विधेयकावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. वक्फ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आल्यानंतर या विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला आहे, या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले निलेश लंके?

"सरकार म्हणते की, या विधेयकामागचा हेतू सशक्तीकरणाचा आहे मात्र हे विधेयक पाहिल्यानंतर असे वाटते की वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सशक्तीकरणाच्या नावाखाली वक्फ बोर्डाला कमजोर करण्याचा धोका दिसतोय. आपण सत्तेत आलो तेव्हा छत्रपती शिवाजी महारांजांचे नाव घेतले पण सत्तेत आल्यानंतर आपण त्यांचे विचार सोडले हे दुर्दैवी आहे. शिवराय हे फक्त तलवार चालणारे योद्धे नव्हते ते सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारे होते," असं निलेश लंके म्हणाले.

तसेच यावेळी निलेश लंके यांनी छत्रपतींची एक कविताही सादर केली. "शिवरायांचा विचार.. सर्वधर्मांना मान दिला सर्वांना सन्मान दिला. जातीपातीचा नको भेद साऱ्यांना दिला एकच वेद न्याय करुया धैर्य अपार, असा होता शिवरायांचा विचार..या विधेयकामध्ये वक्फ बोर्डाला सशक्त करण्याच्या नावाखाली त्याची जमीन हडपण्याचा डाव दिसतो आहे. त्यामुळे मला काही सूचना करायच्या आहेत," अशी मागणीही निलेश लंके यांनी केले. 

ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill : वक्फ विधेयकाची गरज का आहे? लोकसभेत केंद्र सरकारनं सांगितली 5 महत्त्वाची कारणं

"वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता त्यामध्ये योग्य बदल करुन सुसुत्रता आणावी. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे संस्थेचे अधिकार हिरावू नये. संबधित अल्पसंख्याकांच्या भावना लक्षात घेता त्या समाजाचे प्रतिनिधी योग्य संख्येने त्या बोर्डामध्ये असावेत.मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन, जैन,  हे अल्पसंख्यांक समाज राष्ट्रीय समाज उभारणीचे भागिदार आहेत, अशी मागणीही त्यांनी केली.

सायरस पुनावाला यांनी कोरोनामध्ये लस दिली. रतन टाटा हे पारसी समाजाचे होते. अब्दुल कलाम यांनी आदर्श काम केले ते मुस्लीम समाजाचे होते. मदर टेरेसा यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम केले. देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग सिख समाजाचे होते. पूर्वी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची निवडणूक होत होती आता सरकार निवड करणार आहे," असा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : सुधारणेमुळे मुस्लिमांमधील मागासवर्गाला संधी मिळत असेल तर विरोधकांना अडचण काय आहे? - रविशंकर प्रसाद