जाहिरात

Amit Shah: बीड ते प्रयागराज.. वक्फने कुठे कुठे जमीन हडपली? अमित शाहंनी सगळा हिशोब मांडला!

Amit Shah On Waqf Amendment Bill: सरकारी मालमत्ता दान करता येत नाही आणि दान फक्त त्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचेच करता येते, असं अमित शहा म्हणाले. 

Amit Shah: बीड ते प्रयागराज.. वक्फने कुठे कुठे जमीन हडपली? अमित शाहंनी सगळा हिशोब मांडला!

Waqf Amendment Bill LIVE Updates:  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये आज केंद्रिय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. या विधेयकावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षातील अनेकांनी या कायद्याचा कडाडून विरोध केला. ज्यावरुन अमित शहा यांनीही विरोधकांना खडेबोल सुनावले तसेच वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकावरुनही स्पष्टीकरण दिले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले अमित शहा?

"सकाळपासून सुरु असलेल्या चर्चा मी बारकाईने ऐकल्या. मला वाटतं की निर्दोष भावनेने किंवा राजकीय भूमिकेमुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.बिलावर चर्चेला उत्तर रिजुजी देतील. मी फक्त त्यावर स्पष्टीकरण देण्याासाठी उभा आहे.  वक्फ हा एक अरबी शब्द आहे. . वक्फची व्याख्या एक-वेळचा धर्मादाय ट्रस्ट अशी केली जाते जिथे लोक वक्फसाठी जमीन दान करतात.  सरकारी मालमत्ता दान करता येत नाही आणि दान फक्त त्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचेच करता येते, असं अमित शहा म्हणाले. 

"ट्रस्ट निर्माण करतात ते ट्रस्टी करतात. वक्फमध्ये सर्वजण इस्लामचे अनुयायी आहेत. वक्फ तेच चालवू शकतात जे इस्लामिक आहेत, आम्हीही तेच म्हणत आहे. कारण त्याचा जन्मच इस्लामच्या सिद्धांतावर झाला आहे. चॅरिटी कमिशनर कायद्यात मुस्लीमही काम करु शकतात. हे धर्माचे काम नाही हे प्रशासकीय काम आहे.  चॅरिटी कमिशनर जर इस्लाम असेल तर तो हिंदूंचे काम कसे करेल. अशाने तुम्ही देश तोडत आहात. मी सर्व मुस्लीम बांधवांना  देतो यामध्ये एकही गैरमुस्लिम सदस्य येणार नाही,"  असे आश्वासन अमित शहा यांनी दिला. 

ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill : वक्फ विधेयकाची गरज का आहे? लोकसभेत केंद्र सरकारनं सांगितली 5 महत्त्वाची कारणं

वक्फची कुठे कुठे संपत्ती?

"2013 मध्ये ज्या तरतुदी आल्या नसत्या तर हे बील आणायचे गरज आली नसती. 2013 मध्ये निवडणुकांच्याआधी काँग्रेस सरकारने दिल्ली सरकारच्या मोठ्या संपत्ती दिल्ली वक्फ बोर्डाच्या नावावर केली. ज्यामुळे दिल्ली लुटियन्सच्या 125 मालमत्ता वक्फला देण्यात आल्या. 2001 ते 2012 मध्ये 2 लाख करोडोंची संपत्ती खासगी संस्थांना भाड्याने दिली. विजयापूरच्या होनवाडमध्ये 1500 एकरवर दावा केला. 500 करोडोंची संपत्ती असलेल्या जागेवर दावा ठोकून पंचतारांकित हॉटेल्सवाल्यांना 12,000 रु भाड्याने दिली कर्नाटकच्या आणखी एका मंदिराच्या 600 एकर जमिनीवर दावा केला.

तेलंगणातील 66,000 कोटीच्या 1700 एकर जमिनीवर दावा केला. गुरुद्वाराशी संबंधित हरियाणामध्ये 14 मैल जमिनीवर दावा केला. प्रयागराजमध्येही चंद्रशेखर आझाद पार्कवर दावा केला.  महाराष्ट्रामधील वडांगे गावातील महादेव मंदिरावर दावा केला. बीडमध्ये कंकलेश्वर मंदिराचीही 12 एकर जमीन वक्फ बोर्डने जबरदस्तीने घेतली. 


ट्रेंडिंग बातमी - Live Update : सुधारणेमुळे मुस्लिमांमधील मागासवर्गाला संधी मिळत असेल तर विरोधकांना अडचण काय आहे? - रविशंकर प्रसाद

अमित शहांच्या भाषणातील मोठे मुद्दे:

  • वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डाची स्थापना 1995  मध्ये झाली.
  • हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक कार्यात आणि दान केलेल्या मालमत्तेत हस्तक्षेप करतो असा गैरसमज आहे.
  • अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी ही चुकीची माहिती पसरवली जात आहे.
  • आम्ही व्होट बँकेसाठी कायदा आणणार नाही, हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या देखभालीसाठी आणले आहे.
  • वक्फचे ऑडिट होईल, पारदर्शकता असेल, आपण हडप केलेल्या जमिनीसाठी न्यायालयात जाऊ शकतो.
  • सर्वांना भारत सरकारच्या कायद्यांचे पालन करावे लागेल.
  • विरोधी पक्ष अल्पसंख्याकांना भडकावत आहे. हा संसदेचा कायदा आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: