जाहिरात
14 hours ago

वक्फचं सुधारणा विधेयक आज 2 एप्रिल रोजी लोकसभेत मांडलं जाणार आहे. याआधी 8 ऑगस्ट 2024 ला हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं होतं. त्यावेळी या विधेयकावरून जोरदार गदारोळ झाला होता. त्यानंतर, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या जेपीसीच्या अहवालानंतर, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळानं आधीच मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाची संसदेत परीक्षा आहे.

2013 ला वक्फ विधेयक मंजूर झालं त्यावेळी भाजप काय करत होतं?- असादुद्दीन ओवैसी

मुस्लीमाना अपमानीत करण्यासाठी हे विधेयक आणले आहे. त्यांना दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठीच हे विधेयक आणले गेले आहे. हे विधेयक मी फाडतो. हा कायदा मी मानत नाही. देशात भांडण लावण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून भाजपकडून केलं जात आहे. हे असंवैधानिक विधेयक आहे.   

LIVE Updates: वक्फ विधेयकावरुन गैरसमज पसरवण्याचे काम सुरु: अमित शाह

सकाळपासून सुरु असलेल्या चर्चा मी बारकाईने ऐकल्या. मला वाटतं की निर्दोष भावनेने किंवा राजकीय भूमिकेमुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.बिलावर चर्चेला उत्तर रिजुजी देतील. मी फक्त त्यावर स्पष्टीकरण देण्याासाठी उभा आहे.  वक्फ हा एक अरबी शब्द आहे. त्याची व्याख्या करायची झाल्यास वक्फ एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. दान त्याच वस्तूंचे  केले जाते ज्या आपल्या आहेत, सरकारी गोष्टींचे दान केले जाऊ शकत नाही: अमित शहा

LIVE Updates: वक्फ विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नाही: अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर म्हणाले आहेत की त्यांच्या सरकारने एका महत्त्वाच्या कायद्यात बदल केले आहेत, ज्यामुळे मुस्लिम समुदायाच्या लोकांना फायदा होईल.  हे विधेयक काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत करेल. त्यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्याबद्दलही बोलले, ज्यामध्ये मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे. याशिवाय, मोदी सरकारच्या काळात सीएए कायदा बनवण्यात आला आहे, जो एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी व्होट बँकेसाठी संविधानाचा व्यापार केला आहे. पण आता या विधेयकाद्वारे लोकांना न्याय मिळेल. जर एखाद्याला न्याय मिळत असेल तर त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही.

LIVE Updates: आजचा दिवस ऐतिहासिक, या विधेयकाला संपूर्णपणे समर्थ करतो: श्रीकांत शिंदे

शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने, मी हे विधेयक संपूर्णपणे समर्थन करतो. आजचा दिवस ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे... आधी कलम 370, मग तिहेरी तलाक आणि CAA, आणि आता गरीबांच्या कल्याणासाठी हे विधेयक या सभागृहात आणण्यात आले आहे: श्रीकांत शिंदे

Arvind Sawant: वक्फ कायद्यामध्ये न्याय देण्याची भूमिका नाही: अरविंद सावंत

सकाळपासून चांगली भाषणे झाली, माझे मित्र रिजुजुंनी चांगले भाषण केले. तुम्ही एखादे बिल आणता तेव्हा तुमचे  उद्दिष्ट काय आहे? तुमचे उद्दिष्ट एखाद्याला न्याय देणे नाही. हिंदूत्वाबद्दलच बोलायचे झाले तर पद्मनाथ मंदिराचा खजिना काढला होता त्याचे काय झाले? केदारनाथ मंदिरातील 300 किलो सोने गायब झाल्याची तक्रार होती, त्याचे काय झाले? अयोध्येतही तुम्हाला धडा मिळाला. 

महाराष्ट्रात नवीन वर्ष आणि रमजान ईदचा उत्साह सुरु होता तेव्हा सौगद ए मोदी सुरु झाले. तुम्ही हे कसे विसरता की मंगळसूत्र ओढले जातील म्हणत होता, युपीच्या मुख्यमंत्र्यांनी बटेंगे तो कटेंगे म्हणाले. आता तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम कसे दाटले? 

वक्फ बोर्ड आधी निवडून येणार होता आता तुम्ही निवडणार इथेच तुम्ही लोकशाही मारली. कारण आता तुम्हाला पाहिजे त्यांना तुम्ही निवडून देणार.. त्यातही तुम्ही दोन गैरमुस्लिम लोक निवडणार आहात. आम्हाला भिती आहे की तुम्ही उद्या आमच्या मंदिरांवरही गैरहिंदू लोक बसवचाल.. लक्षात ठेवा आम्ही त्याला विरोध करु.. हे सर्व कशासाठी करत आहात? 

LIVE Update: वक्फ कायदा मुस्लिमविरोधी नाही: जेडीयू खासदार लल्लन सिंग

वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत जेडीयूचे खासदार लल्लन सिंह म्हणाले की, हे विधेयक सभागृहात मांडल्यापासून ते मुस्लिमविरोधी असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. वक्फ ट्रस्ट धार्मिक नाही आणि त्याचे उद्दिष्ट सर्व घटकातील लोकांना न्याय देणे हे असले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी देशाच्या हितासाठी चांगले काम केले आहे आणि देशातील जनता त्यांना आवडते. म्हणूनच पंतप्रधान मोदी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहेत आणि देशातील मुस्लिमांसाठीही काम केले जात आहे. लल्लन सिंग यांचा असा विश्वास आहे की हे विधेयक मंजूर झाल्यामुळे लोकांना वक्फपासून मुक्तता मिळेल.

Live Update : देशाला वाचवायचं असेल तर राजकारण आणि धर्म या गोष्टी वेगळ्या ठेवा - ए. राजा, नेता डीएमके

राजकारण आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देशाला वाचवायचं असेल तर राजकारण आणि धर्म या गोष्टी वेगळ्या ठेवा.

ए. राजा, नेता डीएमके  

Live Update : वक्फ विधेयक हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय - अखिलेश यादव

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाच्या सेक्युलर प्रतिमेला धक्का बसेल. वक्फ विधेयक हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय आहे.   

अखिलेश यादव, नेता सपा

Live Update : वक्फच्या जमिनीपेक्षा, चीनने भारताची किती जमीन लाटली हा खरा प्रश्न आहे - अखिलेश यादव

वक्फच्या जमिनीपेक्षा, चीनने भारताची किती जमीन लाटली हा खरा प्रश्न आहे. चीनने किती गावं वसवली हा खरा प्रश्न आहे. पण त्यावर गोंधळ नको म्हणूनच, राजकीय फायद्यासाठी भाजपने वक्फ विधेयक आणलं आहे. 

अखिलेश यादव, नेता सपा

Live Update : ...तर राज्यघटनेच्या कलम 25 नुसार वक्फ कायदा सुधारणेचा अधिकार मिळतो - रविशंकर प्रसाद

वक्फची जमीन वाया जात असेल, लुटली जात असेल तर राज्यघटनेच्या कलम 25 नुसार वक्फ कायदा सुधारणेचा अधिकार मिळतो. 

रविशंकर प्रसाद, भाजप खासदार

Live Update : नव्या सुधारणेनुसार मुस्लिमांमधील मागासवर्गाला संधी मिळत असेल तर विरोधकांना अडचण काय आहे? - रविशंकर प्रसाद

बिहार, उत्तर प्रदेशात अनेक मागासवर्गातील मुस्लीम आहेत. त्यांना वक्फमध्ये संधी मिळत नाही. नव्या सुधारणेनुसार मुस्लिमांमधील मागासवर्गाला संधी मिळत असेल तर विरोधकांना अडचण काय आहे? 

रविशंकर प्रसाद, भाजप खासदार

Live Update : सरकारकडून दिशाभूल केली जात आहे - गौरव गोगोई

दोन पेक्षा जास्त महिला वक्फमध्ये असाव्यात हे यापूर्वीच्या 1995 च्या वक्फ अॅक्टमध्ये नमूद आहे. मात्र सरकारकडून दिशाभूल केली जात आहे. 

Live Update : सरकारला आपल्या धर्माचं सर्टिफिकेट द्यावं लागेल - गौरव गोगोई

आज देशातील अल्पसंख्यांकाची अशी अवस्था झालीये की, त्यांना सरकारला आपल्या धर्माचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. इतर धर्मियांकडून पाच वर्षांचं सर्टिफिकेट मागणार का? मग हे वक्फ सुधारणा विधेयकातच का? 

गौरव गोगोई, इंडियन नॅशनल काँग्रेस

Live Update : आदिवासींची जमीन वक्फमध्ये घेता येऊ शकत नाही

आदिवासींची जमीन वक्फमध्ये घेता येऊ शकत नाही. कुटुंबातील महिलेचा अधिकार सुरक्षित करून वक्फसाठी संपत्ती देता येऊ शकते.  

ट्रिब्युनल दोन सदस्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, आता तीन सदस्यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. 

 

वक्फमध्ये  बिगर मुस्लीम असू नये हा तर्क चुकीचा आहे. 

Live Update : वक्फचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन झालं तर केवळ मुस्लीम समाजच नाही तर देशाचं नशीब बदलेल - रिजिजू

वक्फकडे सध्या 8.72 लाख एकर संपत्ती आहे. या संपत्तीचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन झालं तर केवळ मुस्लीम समाजच नाही तर देशाचं नशीब बदलेल.

Live Update : वक्फमध्ये चार बिगर मुस्लीम यांचा समावेश असेल, यात दोन महिला अनिवार्य असतील

किरण रिजिजू, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री 

सरकार कोणत्याही धार्मिक व्यवस्थेला, संस्थेला हस्तक्षेप करू इच्छित नाही. वक्फचा धार्मिकतेची संबंध नाही. वक्फ केवळ संपत्तीसंबंधित आहे. 

वक्फने संसदेच्या जमिनीवरही दावा केला होता. नरेंद्र मोदींचं सरकार नसतं तर संसदेची जागा वक्फकडे गेली असती. 

वक्फ बोर्डात शिया, सुन्नी, बोहरा मुस्लीमांमधील मागासवर्ग, महिला आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्याची तरतूद असेल.

चार बिगर मुस्लीम यांचा समावेश असेल, यात दोन महिला अनिवार्य. 

Live Update : जगातील सर्वाधिक वक्फ संपत्ती भारतात आहे. तरीही भारतातील मुस्लीम गरीब का आहेत?

जगातील सर्वाधिक वक्फ संपत्ती भारतात आहे. तरीही भारतातील मुस्लीम गरीब का आहेत? त्याच्या उन्नतीसाठी काम का करण्यात आलं नाही?

Live Update : वक्फ लोकसभेत सादर होत असताना विरोधकांकडून गोंधळ..

वक्फ लोकसभेत सादर होत असताना विरोधकांकडून गोंधळ..

Live Update : मोदींचं सरकार आलं नसतं तर संसदेच्या जागेवरही वक्फने दावा केला असता - किरण रिजीजू

अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजीजू म्हणाले, 

2013 मध्ये अशी काही पावलं उचलण्यात आली त्यावर संताप व्यक्त केला गेला. 

या देशातील कोणत्याही धर्माची व्यक्ती वक्फ देऊ शकतो. 

सर्व वक्फ बोर्डाचं विभाजन करण्यात आलं. शिया पंथियांच्या बोर्डात शियाच असतील. सेक्शन 108 नुसार, वक्फ बोर्ड देशातील कोणत्याही कायद्याच्या वर राहील. 125 जागांना अधिसूचना देण्यात आल्या होत्या, जर मोदींचं सरकार आलं नसतं तर संसदेच्या जागेवरही वक्फने दावा केला असता. 

Live Update : भारताच्या संसदीय इतिहासात इतकी चर्चा कधीच कोणत्या विधेयकासाठी झाली नाही - किरण रिजीजू

भारताच्या संसदीय इतिहासात इतकी चर्चा कधीच कोणत्या विधेयकासाठी झाली नाही. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. या विधेयकासंदर्भात ९७ लाख ऑनलाइन याचिका सरकारने पाहिल्या आहेत. - किरण रिजीजू 

Live Update : किरण रिजीजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यास सुरुवात...

किरण रिजीजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यास सुरुवात...

Live Update : आमच्या समितीत लोकशाही आहे - अमित शाह

कॅबिनेटने सुधारणा विधेयक मंजूर केलं असून थोड्याच वेळात किरण रिजीजू सादर करतील - अमित शाह

आमच्या समितीत लोकशाही आहे. समिती कोणत्याही विधेयकात सुधारणा आणू शकतो. यापूर्वी अशा दुरुस्ती झाल्या आहेत. 

Live Update : वक्फ सुधारणा विधेयक संसदेत, 8 तासांच्या चर्चेअंती होणार फैसला

Live Update : वक्फ सुधारणा विधेयक संसदेत, 8 तासांच्या चर्चेअंती होणार फैसला 

Live Update : काही वेळात संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार

काही वेळात संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे. दरम्यान यावरून आता वक्फ बोर्ड जमिनीचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी देखील आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. हे सरकार जाणीवपूर्वक वक्फ जमिनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी हा कायदा आणत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

Live Update : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन

Live Update : पुणे शहरात पुन्हा कोयत्याची दहशत

पुणे शहरात पुन्हा कोयत्याची दहशत 

नागरिकांच्या घरावर कोयत्याने वार करण्यात आल्याचा प्रकार घडला. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. चोरीच्या उद्देशाने अनेक नागरिकांच्या घरावर कोयत्याने वार करण्यात आले. काल मध्यरात्री येरवड्यातील कामराज नगरमध्ये ही घटना घडली. दरम्यान येरवडा पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Live Update : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलिसांकडून तिसरं समन्स

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलिसांकडून तिसरं समन्स

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लीम समाजासाठी क्रांतीकारक निर्णय घेतले - मुरलीधर मोहोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लीम समाजासाठी क्रांतीकारक निर्णय घेतले - मुरलीधर मोहोळ

ट्रिपल तलाकवर बंदी आणली.

वक्फच्या जमिनीचा उपयोग शैक्षणिक सामाजिक कामांसाठी व्हायला हवा

परंतु गरीब मुस्लिमांना याचा फायदा होत नव्हता. 

संसदीय घटनेतील सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. 

मुस्लिम समाजातील बांधवांच्या हक्कासाठी हा कायदा आहे

Live Update : चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला एका अटीवर पाठिंबा

चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला एका अटीवर पाठिंबा

वक्फ बोर्डात बिगर मुस्लीम सदस्य नको, असं नायडूंनी भाजपला सांगितल्याची माहिती आहे. 

Live Update : ठाकरे गटाकडून व्हिप जारी, सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश

ठाकरे गटाकडून व्हिप जारी, सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश 

लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिप जारी करीत सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

Live Update : 15 टक्के परताव्याच्या अमिषातून कोट्यवधीची फसवणूक

कोल्हापुरात फॉरेक्स शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करवीर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणात 10 ते 15 टक्क्यांहून जादा परतावा देण्याचे आमिष देणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. फुलेवाडी, जिवबा नाना जाधव पार्कसह उपनगरातील गुंतवणूकदारांची ही फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Live Update : बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक आक्रमक

बीडमधील दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल. मागील नऊ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाला बाहेर शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. 

आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळेचे कर्मचारी शिक्षक आक्रमक झाले आहेत. 

Live Update : राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा

राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार कार्यशाळेला उपस्थित

येत्या 4 आणि 5 एप्रिलला पुण्यात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा

कार्यशाळेतून मुख्यमंत्री घेणार 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा

यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, तसेच महत्त्वाचे महसूल अधिकारीही उपस्थित राहणार असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार संबोधित करणार

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल 

राष्ट्रवादीचे बीडचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले...

Live Update : वर्ध्यात मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

वर्ध्यातील काही भागात जोरदार वाऱ्यामुळे व विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस आल्याने गहू व कांदा पिकाला मात्र फटका बसण्याची शक्यता आहे. 

Live Update : वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई, प्रशासनाचा कृती आराखडा तयार

वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून आतापर्यंत १५ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातील एका गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून एका गावात कूपनलिका अधिग्रहित करण्यात आली आहे.

Live Update : शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

शेगाव-खामगाव महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू  झाल्याची माहिती मिळत आहे. तर वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. खाजगी प्रवासी बस, एसटी बस  आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर  धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. 

Live Update : बीड कारागृहात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

बीड कारागृहात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

वाल्मीक कराड व महादेव गिते समर्थकांत झाला होता वाद

जिल्हा कारागृहात वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची होती चर्चा

कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे व राजेश वाघमोरेंवर गुन्हा दाखल

फोन करण्याच्या कारणावरून सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाल्याचा दावा

कारागृह प्रशासनाच्या तक्रारीत वाल्मीक कराडच्या नावाचा मात्र उल्लेख नाही