केरळमधील वायनाडमध्ये (Wayanad News) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) सोमवारी रात्री उशीरा चार वेगवेगळ्या ठिकाणांवर भूस्खलन झालं. रात्री 2 वाजेपासून सकाळी 6 पर्यंत झालेल्या भूस्खलनात चार गावं वाहून गेली. मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझामध्ये घर, पुल, रस्ते आणि गाड्यादेखील वाहून गेल्या.
आतापर्यंत या भूस्खलनात (Landslide in Wayanad) 143 जणांचा मृत्यू झाला असून 128 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अद्याप शेकडोहून अधिक जणं बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. रेस्क्यूसाठी आर्मी आणि हवाई दल, SDRF, NDRF च्या टीम तैनात आहेत. लष्कराने रात्री उशीरापर्यंत एक हजारांहून जास्त लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. रात्रीच्या अंधाराचा रेस्क्यू करण्यास अडथळा येत असल्याने ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून रेस्क्यूचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
नक्की वाचा - केरळच्या वायनाडमध्ये 'माळीण'ची पुनरावृत्ती, भूस्खलनामुळे 43 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक अडकल्याची भीती
#WATCH | Kerala: Rescue and search operation underway in Wayanad's Chooralmala after a landslide broke out yesterday early morning claiming the lives of 143 people
— ANI (@ANI) July 31, 2024
(latest visuals) pic.twitter.com/aqAG9uZMEP
हवामान विभागाने वायनाडसह पाच जिल्हे मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. चारुलमाला गावात अनेक जणं झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. घटनास्थळी सकाळपासून एनडीआरआफ, लष्कर, वायूसेनेची पथकं बचावकार्यात प्रयत्नांची शर्थ करताय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केलीय. लोकसभेतले विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी घटनास्थळी भेट देणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते आज वायनाडमध्ये जाऊ शकणार नाहीत. मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही फटका बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world