Rahul Gandhi On Brazil Model : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधई यांनी आज बुधवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभेत कशाप्रकारे मतचोरी झाली, याचं खळबळजनक उदाहरण समोर आणलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दावा केला आहे की,वर्ष 2024 मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान 25 लाख बोगस मतदान झालं होतं. अशातच त्यांनी आता भाजपवर 'हायड्रोजन बॉम्ब'ही टाकला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी याआधीही धक्कादायक खुलासे केले होते. त्यांनी आता एका महिलेचा फोटो समोर आणला आहे, ज्या महिलेनं नाव बदलून अनेकदा मतदान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही महिला नेमकी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला आणि त्याचसोबत एक वोटर लिस्टही दाखवली. यामध्ये अनेक ठिकाणी त्या महिलेचा फोटो लावलेला होता. प्रत्येक ठिकाणी तिचं नाव, पत्ता आणि इतर माहिती वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात आली होती. महिलेचा फोटो दाखवून राहुल गांधींनी पत्रकार आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारलं की, ही महिला कोण आहे? या महिलेचं नाव काय आहे? ही महिला कुठे राहते? त्यानंतर राहुल गांधी यांना स्वत: उत्तर देत म्हटलं, या महिलेनं हरियाणाने 22 वेळा मतदान केलं आहे. तसच वेगवेगळ्या बुथमध्येच तिने मतदान केलं आहे. कधी सीमा, कधी सरस्वती, तर कधी रश्मी नावाने तिनं मतदानं केलं आहे.
नक्की वाचा >> Love Jihad 2 मुस्लीम भाऊ आणि 1 हिंदू मुलगी..एकाने बाथरूममध्ये केलं सर्वात घाणेरडं कृत्य, चीड आणणारी घटना!

ब्राझीलची एक मॉडेल
राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, ही महिला भारतातील नाही, तर एक ब्राझीलियन मॉडेल आहे. त्यांनी म्हटलं की, ही एक स्टॉक फोटोग्राफर आहे. हरियाणात अशाचप्रकारच्या 25 लाख रेकॉर्ड्समध्ये तिचं नाव सामील आहे. ज्या महिलेचा फोटो राहुल गांधी यांनी दाखवला, ती एक ब्राझीलियन मॉडेल आहे. तिच्या फोटोग्राफला एका प्रोफेशनल फोटोग्राफर मॅथ्यूज फरेरो यांनी एका वेबसाईडवर (Unplash.com) अपलोड केलं होतं.
नक्की वाचा >> Video: पप्पा..जिंकलो! वडिलांना पाहताच हरमनप्रीत-जेमिमानं मैदानात जे केलं..अमोल मुझुमदारसह सर्वच झाले थक्क
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world