जाहिरात
Story ProgressBack

Tanushree Dutta : मिस इंडिया ते अध्यात्मापर्यंतचा प्रवास, तनुश्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेतला?

भारतात परतल्यानंतर तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील मोठी गोष्ट सांगितली. डिप्रेशनमध्ये असल्या कारणाने तिने अध्यात्मचा मार्ग निवडला. त

Read Time: 2 min
Tanushree Dutta : मिस इंडिया ते अध्यात्मापर्यंतचा प्रवास, तनुश्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेतला?
मुंबई:

'आशिक बनाया आपने' या चित्रपटात आपल्या बोल्ड अदांनी लाखोंच्या मनाचा ताबा मिळवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने वयाची चाळीशी गाठली आहे. तनुश्रीने 2005 मध्ये आशिक बनाया आपने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात दत्तासोबत इमरान हाशमीने भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांनी पसंत केली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त तनुश्री दत्ता 'ढोल' ‘भागम भाग', '36 चाइना टाउन', 'स्पीड', 'सास बहू और सेंसेक्स', 'रोक' आणि 'रिस्क' या चित्रपटातही दिसली आहे. मात्र काही काळानंतर अभिनेत्रीने अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र बॉलिवूडमधील करिअर सोडून तनुश्रीने अध्यात्माच्या मार्गावर जाण्यामागील कारण काय?

19 मार्च, 1984 मध्ये झारखंडच्या जमशेदपूरमध्ये जन्माला आलेली तनुश्रीचा जन्म बंगाली कुटुंबात झाला आहे. दत्ताने शालेय शिक्षण जमशेदपूरमधून पूर्ण केलं. यानंतर तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र मॉडेलिंग करायच्या इच्छेने तिने शिक्षण अर्धवट सोडलं. 2004 साली तनुश्री मिस इंडिया झाली. यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.    

तनुश्रीने आशिक बनाया आपने या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील तनुश्री दत्ताच्या अभिनयाचं कौतुक झालं. सोबतच तिच्या बोल्ड सीन्सची बरीच चर्चा होती. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटात आपलं नशीब आजमावलं. 2005 मध्ये वीरभद्र या तेलुगु चित्रपट तिने भूमिका साकली. यानंतर 'भागम भाग', 'डोल', '36 चाइना टाउन', 'स्पीड', 'गुड बॉय बॅड बॉय', 'चॉकलेट' आणि 'रकीब' या चित्रपटात काम केलं. 2010 मधील अपार्टमेंट या चित्रपटानंतर तनुश्रीने कोणत्याही चित्रपटा काम केलं नाही. या चित्रपटानंतर तनुश्रीने बॉलिवूडला अलविदा म्हटलं आणि अध्यात्मच्या मार्गावर जाणं पसंत केलं. तनुश्री यानंतर अमेरिकेत निघून गेली. यानंतर 2018 मध्ये ती पुन्हा भारतात परतली. 

भारतात परतल्यानंतर तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील मोठी गोष्ट सांगितली. डिप्रेशनमध्ये असल्या कारणाने तिने अध्यात्मचा मार्ग निवडला. तनुश्री भारतात परतल्यानंतर तिने २०१८ मध्ये नाना पाटेकरसह गणेश आचार्य, समी सिद्दीकी आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 

बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत भेदभाव झाल्याचा खुलासा तनुश्रीने 2018 मध्ये केला होता. यादरम्यान तिने नाना पाटेकरांवर मी टूचा आरोप केला होता. 2009 मध्ये  नाना पाटेकरांनी एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तनुश्रीसोबत उद्धटपणा केला होता. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination