
Sam Billings: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख उत्तर दिलंय. भारतीय वायू सेनेनं 'ऑपेशन सिंदूर' (Operation Sindoor) च्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील 9 ठिकाणी (India launches air strikes on Pakistan) हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट लीग खेळत असलेला (PSL) इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सला धक्का बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सॅम बिलिंग सध्या पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळतोय. तो लाहोर कलंदर्स या टीमचा सदस्य आहे. भारतानं मध्यरात्री हल्ला केल्यानंतर जगाला एअर स्ट्राईकची माहिती दिली. भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' ची माहिती दिल्यानंतर लगेच त्याचे जगभर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या सॅम बिलिंग्सनं देखील या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव लवकर कमी व्हावा ही प्रार्थना', अशी प्रतिक्रिया बिलिंग्सनं सोशल मीडियावर दिली. ही प्रतिक्रिया वेगानं व्हायरल होत आहे.
Praying India and Pakistan situation deescalates asap 🙏🏼
— Sam Billings (@sambillings) May 6, 2025
काही दिवसांपूर्वी सॅम बिलिंग्सला आयपीएल आणि पीएसलमध्ये (Sam Billings on IPL vs PSL) कोणती लीग बेस्ट आहे? या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. बिलिंग्सनं आयपीएलच बेस्ट असल्याचं सांगितलं होतं. आयपीएलच्या ग्लॅमरपुढे पीएसएल कुठंच नाही. फक्त पीएसएलच नाही तर जगातील कोणतीही दुसरी लीग आयपीएलपुढं फिकी आहे, असं बिलिंग्सनं सांगितलं होतं.
( नक्की वाचा : Sunil Gavaskar: 'पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर करा', सुनील गावस्करांची मोठी मागणी )
भारताची संयमी आणि ठोस कारवाई
भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळावर हल्ला चढवला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. हल्ल्याचं स्थळ निवडताना भारताने कमालीचा संयम दाखवून फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचं स्पष्ट केलं आहे.
पहलगामध्ये निष्पाप भारतीयांच्या हत्येस जबाबदार असलेल्या अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. त्यानुसार भारतानं हा हल्ला करत निरापराध भारतीयांची हत्या करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world