जाहिरात

Relationship News : चुकीच्या व्यक्तीसोबत नात्यात असाल तर स्त्रियांच्या शरीरात दिसतात ही 10 लक्षणं, दुर्लक्ष करू नका!

Signs Of A Bad Relationship : जेव्हा मुली चुकीच्या नात्यात असतात तेव्हा शरीरात काही बदल जाणवू लागतात. त्याकडे दुर्लक्ष करणं त्रासदायक ठरू शकतं.

Relationship News : चुकीच्या व्यक्तीसोबत नात्यात असाल तर स्त्रियांच्या शरीरात दिसतात ही 10 लक्षणं, दुर्लक्ष करू नका!
Relationship Advice By Relationship Coach

Signs Of A Bad Relationship : एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात असाल तर मुली आपलं सर्वस्व त्या व्यक्तीला देतात. समोरच्या व्यक्तीसोबत राहणं, त्याचं बोलणं मनाला नेहमी भावतं. मात्र नात्यात एक वेळ अशी येते जेव्हा नात्यातील दुरावा वाढू लागतो. विशेषत: मुली हा दुरावा लवकर ओळखतात. मात्र तरीही नातं संपवणं त्यांच्यासाठी कठीण जातं. तिचा पार्टनर तिच्यासाठी योग्य नाही याचा स्वीकार करणं मुलींना कठीण जातं. बऱ्याचदा जगाच्या हे लक्षात येतं, मात्र त्या मुलीला हे कटू सत्य स्वीकारणं शक्य होत नाही. 

मुली चुकीच्या व्यक्तीसोबत नात्यात असतील तर तिच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात असं म्हटलं जातं. रिलेशनशिप कोच वंदना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते 10 लक्षणांबद्दल बोलत आहेत. या लक्षणांमधून ही बाब समोर येते की, मुलगी योग्य व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नाही. 

Night Shift: रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये वाढतेय प्रजनन क्षमतेसंबंधी समस्या, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

नक्की वाचा - Night Shift: रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये वाढतेय प्रजनन क्षमतेसंबंधी समस्या, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

चुकीच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने शरीरात दिसतात ही 10 लक्षणे..

  1. पार्टनरचा स्पर्श तुम्हाला आवडत नाही, अस्वस्थ वाटू लागतं आणि Exciting वाटत नाही. 
  2. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला उत्साही वाटत नाही, त्याच्यासोबत असताना तुमची एनर्जी ड्रेन होऊ लागते. दोघांमधील अंतर वाढल्याचं लक्षात येतं. 
  3. Physical distance वाढल्याचं जाणवू लागतं. एकत्र असतानाही एकटं असल्याचं वाटतं. 
  4. कोणतंही नेमकं कारण नसताना मूड स्विंग्स होऊ लागतात. 
  5. रात्री नीट झोप येत नाही. झोपताना सुरक्षित वाटत नाही, योग्य वाटत नाही. 
  6. व्यक्त न करता येणाऱ्या वेदना तुम्हाला शरीरात जाणवत राहतात. एक प्रकारे टेन्शनची भावना येत असते. 
  7. पोट बिघडत राहतं, पोट फुगण्याचा त्रास जाणवतो. यामुळे अस्वस्थ वाटू लागतं. 
  8. तुमच्यात स्पार्क राहत नाही. छान तयार व्हावं असं वाटत नाही. चेहऱ्यावरील ग्लो गायब होतो आणि चांगलं फिलिंग येत नाही. 
  9. प्रत्येक वेळी एके प्रकारे नैराश्याची भावना असते. चिंताग्रस्त विचार सतत आपला पाठलाग करत असल्यासारखं वाटतं. 
  10. आयुष्य निर्जीव वाटू लागतं, असं वाटतं की, तुम्ही फक्त अस्तित्वात आहात, मात्र यात जगण्याचा उत्साह नसतो. 

रिलेशनशिप कोच यांचं म्हणणं आहे की, जर तुम्हालाही असं वाटत असेल किंवा तुमच्या शरीरात असे बदल दिसत असतील तर यावर नात्याबद्दल विचार करायला हवा. आपल्या शरीरात होणारे बदल दुर्लक्षित करू नका. आतला आवाज ऐका, त्याकडे दुर्लक्ष करू नका. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com