Akshaya Navami 2025 Date And Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याचे अतिशय महत्त्व आहे. या महिन्यात दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, भाऊबीज यासारखे सण साजरे केले जातात. याच महिन्यातील शुक्लपक्षाच्या नवमी तिथीला अक्षय्य नवमी साजरी केली जाते. यास कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी असेही म्हणतात. मान्यतेनुसार ही तिथी अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष स्वरुपात पूजा केल्यास अनंत पुण्य मिळतात, असेही म्हणतात. यंदा अक्षय्य नवमी कधी आहे, शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
अक्षय्य नवमी तिथी Akshaya Navami 2025 Tithi
अक्षय्य नवमी तिथी प्रारंभ तारीख आणि वेळ (Navami Tithi Begins) 30 ऑक्टोबर 2025 सकाळी 10:06 वाजता
अक्षय्य नवमी तिथी समाप्त तारीख आणि वेळ (Navami Tithi Ends) 31 ऑक्टोबर 2025 सकाळी 10:03 वाजता
अक्षय्य नवमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त | Akshaya Navami 2025 Shubh Muhurat
पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाची नवमी तिथी यंदा 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:06 वाजता सुरू होणार असून 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:03 तिथी समाप्त होत आहे. यानुसार अक्षय्य नवमी 31 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल. पूजेसाठीचा मुहूर्त सकाळी 06:06 वाजेपासून ते सकाळी 10:03 वाजेदरम्यान असणार आहे. पूजा करण्यासाठी जवळपास तीन तास मिळतील.
Akshaya Navami 2025 Puja Shubh Muhurat
31 ऑक्टोबर 2025 : सकाळी 06:38 वाजेपासून ते सकाळी 10:03 वाजेपर्यंत आहे.
पूजा कालावधी : 03 तास 25 मिनिटे
अक्षय्य नवमीची पूजा कशी करावी? | Akshaya Navami 2025 Puja Vidhi
- अक्षय्य नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष स्वरुपात पूजा केली जाते.
- मान्यतेनुसार सूर्योदयापूर्वी स्नान-ध्यान करावे. यानंतर आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पित करावे.
- आवळ्याच्या झाडाला हळद-कुंकू, चंदन, अक्षता, धूप-अगरबत्ती, फुले-फळे इत्यादी गोष्टी अर्पण कराव्या, विधीवत पूजा करावी.
- आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालावी.
- मान्यतेनुसार आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास भगवान विष्णू यांची कृपा होते. सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.
- अक्षय्य नवमीच्या दिवशी प्रसाद म्हणून आवळ्याचे सेवन केल्यास निरोगी आरोग्याचा आशीर्वाद मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world