जाहिरात
This Article is From May 09, 2024

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नाही? मग विकत घेऊ शकता या शुभ गोष्टी 

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण काही कारणास्तव अनेकांना सोने खरेदी करणे शक्य नसते. पण सोन्याऐवजी आपण अन्य शुभ गोष्टी खरेदी करू शकता. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती... 

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नाही? मग विकत घेऊ शकता या शुभ गोष्टी 
सोन्याऐवजी या वस्तू देखील करू शकता खरेदी (Photo Credit - Canva)

Akshaya Tritiya 2024 : वैशाख शुद्ध तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' (Akshaya tritiya) साजरी केली जाते. यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया सण राज्यासह देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी धनाची देवता कुबेर यांना सोन्याचा खजिना सापडला होता, असे म्हटले जाते. तसेच महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी अक्षय्य तृतीयेची तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी केलेले कोणतेही कार्य कधीही क्षय होत नाही, म्हणजे ते कायम आपल्याजवळचे राहते; अशीही मान्यता आहे. या दिवशी धार्मिक विधी करणे आणि सोने खरेदी (Buying gold) करणेही शुभ मानले जाते. पण सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही अन्य वस्तू देखील करू शकता. अक्षय्य तृतीये दिवशी सोने खरेदीची शुभ वेळ तसेच सोन्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या गोष्टी खरेदी करू शकतो, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

(नक्की वाचा: अक्षय्य तृतीयेला जुळून येत आहे मोठा शुभ योग, जाणून घ्या पूजा-सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)

अक्षय्य तृतीयेची तिथी, वेळ-सोने खरेदीचा शुभ मुहूर्त l Shubh Muhurat For Buying Gold

अक्षय्य तृतीयेची तिथी आणि वेळ 

यंदा वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 10 मे रोजी पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 11 मे रोजी 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत तिथी समाप्त होईल.  
पूजेचा शुभ मुहूर्त : पहाटे 5 वाजून 33 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंतचा काळ पूजा करण्यासाठी शुभ आहे. 

खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त  

  • पहिला शुभ मुहूर्त: पहाटे 5 वाजून 33 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ आहे.
  • दुसरा शुभ मुहूर्त: दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 59 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ आहे
  • तिसरा शुभ मुहूर्त: संध्याकाळी 5 वाजून 21 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजून 02 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ आहे
  • चौथा शुभ मुहूर्त: रात्री 9 वाजून 40 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजून 59 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ आहे

(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या नातेवाईक-मित्रपरिवाराला मराठीतून पाठवा खास शुभेच्छा)

काय खरीदे करावे?

अक्षय्य तृतीयेला सोने किंवा चांदीचे दागिने, सोन्या-चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते.  

या वस्तू देखील करू शकता खरेदी 

सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शक्य नसल्यास आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीचे मडके, भांडी, जव, पिवळी मोहरी, दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र किंवा धणे खरेदी करू शकता. 

या गोष्टी चुकूनही खरेदी करू नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्लास्टिक, अशुद्ध धातू, काळे कपडे, धारदार वस्तू खरेदी करणे टाळावे. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

VIDEO:अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे उघडणार द्वार, सुरू आहे जय्यत तयारी
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com