
Scooter Price After GST Rate Cut: केंद्र सरकारने देशातील वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, 22 सप्टेंबरपासून वाहनांसाठी नवीन जीएसटी दर लागू होतील. या बदलामुळे 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या लहान बाइक्स आणि स्कूटर्स स्वस्त होणार आहेत, तर लक्झरी आणि मोठ्या इंजिन क्षमतेच्या गाड्यांवर जास्त कर लागणार आहे.
या निर्णयामुळे 350 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या टू-व्हीलरवरचा जीएसटी दर 28% वरून 18% वर आला आहे. या बदलाचा भारतीय टू-व्हीलर बाजाराला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच, 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोठ्या मोटरसायकलवर 40% जीएसटी लागू होईल.
(नक्की वाचा- Bike Rates After GST Cut: स्प्लेंडर, होंडा शाईन, बजाजची प्लॅटिना; कोणती बाईक अधिक स्वस्त होणार?)
या जीएसटी कपातीचा फायदा वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या सणासुदीच्या हंगामात विक्री वाढण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबरपासून अनेक बाइक्स आणि स्कूटर्सच्या किमतीत लक्षणीय घट होणार आहे.
उदाहरणार्थ, होंडा ॲक्टिव्हा 125 ची सध्याची किंमत 81,000 रुपये आहे, ती आता 74,250 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने देखील त्यांच्या विविध मॉडेल्सवरील जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे जाहीर केले आहे. टीव्हीएसच्या बाइक्स 22,000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत.
(नक्की वाचा: GST कर बदलांमुळे कोणती कार किती रुपयांनी होणार स्वस्त? किती पैसे वाचतील, पाहा यादी)
स्कूटर्सच्या अपेक्षित नवीन किमती
होंडा ॲक्टिव्हा 125: सध्याची किंमत 81,000 रुपयांवरून 74,250 रुपये. (अपेक्षित घट 6,750 रुपये).
- टीव्हीएस ज्युपिटर 125: सध्याची किंमत 77,000 रुपयांवरून 70,667 रुपये. (अपेक्षित घट 6,333 रुपये).
- सुझुकी ॲक्सेस 125: सध्याची किंमत 79,500 रुपयांवरून 72,889 रुपये. (अपेक्षित घट 6,611 रुपये).
- हिरो माएस्ट्रो एज 125: सध्याची किंमत 76,500 रुपयांवरून 70,111 रुपये. (अपेक्षित घट 6,389 रुपये).
- टीव्हीएस एनटॉर्क 125 : सध्याची किंमत 85,000 रुपयांवरून 77,778 रुपये (अपेक्षित घट 7,222 रुपये).
- सुझुकी बर्गमन स्ट्रीट 125, यामाहा फास्किनो 125 आणि इतर मॉडेल्सच्या किमतीतही मोठी घट होणार आहे.