5 drink for healthy lifestyle : अवघ्या दोन दिवसात नववर्षाची सुरुवात होईल. नव्या वर्षात नवे संकल्प आखले जातात. तुम्हीही यंदापासून आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा निश्चय करा. आरोग्य चांगलं असेल तर व्यक्ती उत्साही राहतो आणि याचा परिणाम त्याच्या कामावर आणि मानसिकतेवरही होत असतो. दरम्यान नववर्षानिमित्ताने पाच महत्त्वाच्या पेयांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा नियमितपणे तुमच्या आहारात समावेश केल्यास सकारात्मक फायदा मिळू शकतो. हे पेय तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. अवघ्या पाच मिनिटात तुम्ही ही पेयं तयार करू शकता. ही ५ मिनिटं तुम्हाला आरोग्यदायी जीवनशैलीच्या दिशेने घेऊन जातील.
आहारात काय बदल कराल?
आलं-लिंबू पाणी...
आलं आणि लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आलं आणि लिंबाचं मिश्रण आपल्या शरीराला ऊब आणि एनर्जी देतं. ज्यामुळे पचन यंत्रणा मजबूत राहते.
हळद आणि दूध...
हळद आणि दूध याला गोल्डन मिल्क म्हटलं जातं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी-खोकल्यातून दिलासा मिळतो. त्वचा उजळून निघते. यासोबतच चांगली झोप येते. शरीराचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी मदत होते.
बडीशेपचा चहा...
बडीशेपचा चहा एक हर्बल टी आहे. बडीशेप पाण्यात उकळून हा चहा तयार केला जातो. २५० मिलीलीटर गरम पाणी आणि १ छोटा चमचा कुटलेली बडीशेप एकत्र करून हा चहा तयार करा. याच्या नियमित सेवनाने सूज कमी होईल आणि पोट फुगीचा त्रास कमी होईल. शिवाय पचन चांगलं होईल.
दालचिनीचं पाणी...
दालचिनीच्या पाण्याने पचन सुधारतं. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. वजन कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचं पाणी फायदेशीर ठरतं. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि आजाराज लढण्यास मदत मिळते.
