
Ashadhi Ekadashi 2025 Faral Recipe: देवशयनी आषाढी एकादशी हा दिवस हिंदूसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. आषाढीचा उपवास करणे लाभदायक मानले जाते. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आषाढी एकादशीनिमित्त नेहमीचाच फराळ करण्याऐवजी यंदा थोडेसे वेगळे पदार्थ तुम्ही तयार करू शकता. जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप रेसिपी....
उपवासाचे बटाट्याचे कटलेट्स
सामग्री
- उकडलेले बटाटे
- उपवासाच्या भाजणीचे पीठ
- शेंगदाण्याचा कुट
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- जीरे
- मीठ
उपवासाच्या बटाट्याच्या कटलेट्सची पाककृती
- उकडलेले बटाटे किसून घ्या.
- बटाट्यामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ मिक्स करा.
- शेंगदाण्याचा कुट, हिरवी मिरची, कोथिंबीर, जीरे आणि मीठ देखील मिक्स करा.
- कटलेट तयार करून घ्या.
- तेल गरम करत ठेवा. गॅसच्या मंद आचेवर कटलेट तळून घ्या.
चटणीसाठी मिक्सरमध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ,आवश्यकतेनुसार पाणी ओतून सर्व सामग्री वाटून घ्या.
शेंगदाण्याची चिक्की रेसिपी
सामग्री
- एक कप भाजलेले शेंगदाणे
- एक कप गूळ
- एक चमचा तूप
- एक चमचा मलई
शेंगदाण्याची चिक्की कशी तयार करावी
- भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करा, त्यामध्ये गूळ वितळवून घ्यावा.
- गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे परतून घ्यावे. मलई देखील मिक्स करावी.
- संपूर्ण सामग्री एकजीव होऊ द्यावी.
- एका ताटामध्ये तूप लावून चिक्कीचे मिश्रण पसरवून घ्यावे आणि ते थंड होऊ द्यावे.
- मिश्रण थंड झाल्यानंतर सुरी किंवा चमच्याच्या मदतीने चिक्की चौकोनी आकारात कापून घ्यावी.
(नक्की वाचा: Devshayani Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व)
उपवासाचे थालीपीठ
- 200 ग्रॅम भिजवलेले साबुदाणे
- दोन हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- एक चमचा जीरे
- तीन चमचे शेंगदाणे
- एक चमचा धणे पावडर
- आवश्यकतेनुसार मीठ
- एक उकडलेला मोठ्या आकाराचा बटाटा
- तीन चमचे तेल
(नक्की वाचा: Devshayani Ekadashi 2025: देवशयनी एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप, जीवनामध्ये येईल अपार सुख-समृद्धी)
साबुदाण्याचे थालीपीठ कसे तयार करायचे?
वरील सर्व सामग्री एकत्रित करा आणि गरम पॅनवर थालपीठ थापा.
दोन्ही बाजूंना थालीपीठ खरपूर शेकून घ्यावे.
शेंगदाण्याच्या चटणीसोबत थालीपीठाचा आस्वाद घ्यावा.
राजगिऱ्याचा पराठा रेसिपी (Rajgira Paratha Recipe)
उपवासाचे साबुदाण्याचे पराठे (Sabudanyache Paratha Recipe)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world