
Unique feat in cricket: क्रिकेटला 'अनिश्चिततेचा खेळ' असेच का म्हटले जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या सामन्याच्या निकालाने सर्वच क्रिकेट प्रेमी आवाक ही झाले आहेत. इंग्लंडमधल्या एका क्लब क्रिकेट सामन्याचा निकाल जबरदस्त लागला. 427 धावांचा पाठलाग करताना समोरची टीम फक्त 2 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात जे घडले, ते पाहून क्रिकेटप्रेमींना धक्काच बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगच्या थर्ड टायर डिव्हिजन वनमधील हा सामना नॉर्थ लंडन सीसी आणि रिचमंड सीसी यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ लंडन सीसी संघाने 45 षटकांत 6 गडी गमावून तब्बल 426 धावांचा विशाल स्कोर उभारला. यामध्ये डॅन सिमन्सने नेत्रदीपक 140 धावांची खेळी केली. तर जॅक लेविथने 43 आणि बिल अब्राहम्सने 42 धावांचे योगदान दिले.

427 धावांचा पाठलाग करण्यासाठी रिचमंड सीसीचा संघ जेव्हा मैदानावर उतरला, तेव्हा कुणीही कल्पना केली नसेल की काय घडणार आहे. अवघ्या 5.4 षटकांत आणि केवळ 2 धावांवर रिचमंड सीसीचा संपूर्ण संघ गारद झाला. संघातील आठ फलंदाज शून्यावर बाद झाले. हा एक असा स्कोरकार्ड होतं ज्यावर विश्वास ठेवणे खरोखरच कठीण आहे.
ट्रेंडिंग बातमी - CSK vs GT: चेन्नईने सामना जिंकला, पण मनं जिंकली 'या' खेळाडूने
रिचमंड सीसीला या सामन्यात 424 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्यांचा संपूर्ण डाव अवघ्या 34 चेंडूंमध्ये संपुष्टात आला. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रसंग फार क्वचितच घडतात. म्हणूनच ही घटना जगभरातील क्रिकेट जगतासाठी आश्चर्याचा विषय बनली आहे. असे अविश्वसनीय निकाल क्रिकेटला आणखी रोमांचक बनवतात असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world