
Hair Growth Faster Tips: लांबसडक आणि घनदाट केस मिळवण्यासाठी काही लोक कित्येक प्रकारचे महागडे उपाय करतात. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर, हवामानातील बदलांमुळे केस कमकुवत होणे आणि केसगळती होणे यासारख्या समस्या उद्भवणे सामान्य गोष्ट आहे. तुम्ही देखील केसगळतीचा सामना करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील अशा पाच आयुर्वेदिक पावडरची माहिती जाणून घेऊया...
केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक पावडर
भृंगराज पावडर
भृंगराज पावडरमध्ये लोह, मॅग्नेशिअम, खनिजांचा साठा आहे. याद्वारे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. भृंगराज पावडरचे हेअरमास्क वापरल्यास केसांमध्ये काही महिन्यांत चांगले बदल दिसतील. भृंगराज तेलाचाही वापर करू शकता.
मंजिष्ठा पावडर
मंजिष्ठा पावडरमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. यामुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते. मंजिष्ठामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्मांचा समावेश आहे. यामुळे कोंडा, अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. मंजिष्ठा आणि दही एकत्रित करुन केसांवर लावू शकता.
ब्राह्मी पावडर
ब्राह्मीमुळे केस मुळासकट मजबूत होण्यास मदत मिळते. शिवाय केस घनदाटही होतील. ब्राह्मी पावडरचे हेअर पॅक वापरल्यास केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढही चांगली होईल.
शिकेकाई पावडर
शिकेकाईला नैसर्गिक शॅम्पू देखील म्हटलं जातं. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. कोंड्याच्या समस्येतून सुटका होऊ शकते.
(नक्की वाचा: Fact Check News: मिठाचा हात लागल्यास केस पांढरे होतात? जाणून घ्या यामागील सत्य)
गुळवेलीची पावडर
गुळवेल केसांसाठीही फायदेशीर मानली जाते. गुळवेलीमुळे कोंडा, दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. गुळवेलीच्या पावडरचे हेअरमास्क वापरल्यास केसांचे तुटणे कमी होईल.
(नक्की वाचा: Omega 3 For Hair And Skin: ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे त्वचा आणि केसांवर काय परिणाम होतात?)
घनदाट आणि लांबसडक केस हवे असल्यास हेअर केअर रुटीनमध्ये या आयुर्वेदिक पावडरचा समावेश करू शकता. आठवड्यातून एक ते दोन वेळा दही किंवा अॅलोव्हेरा जेलमध्ये यापैकी एखादी पावडर मिक्स करुन केसांवर लावा. केसांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world