जाहिरात

Hair Growth Tips: आवळा की भृंगराज, केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?

Hair Growth: आवळा आणि भृंगराज तेल केसांसाठी चांगले मानले जाते. केसांच्या वाढीसाठी यापैकी कोणत्या तेलाचा वापर करावा, जाणून घेऊया माहिती...

Hair Growth Tips: आवळा की भृंगराज,  केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?
"Hair Care Tips: केसांच्या वाढीसाठी चांगले तेल कोणते?"

Hair Growth Tips: आपलेही केस जाड, काळेभोर, घनदाट असावे; अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. यासाठी कित्येकजणी असंख्य प्रकारचे उपायही करतात. केसांच्या वाढीसाठी लोकांचा नैसर्गिक उपचार करण्यावर अधिक भर असतो. यापैकीच एक उपाय म्हणजे आवळा आणि भृंगराज तेल. केसांच्या वाढीसाठी आवळा (Amla Oil) तसेच भृंगराज तेल (Bhringraj Oil) अतिशय फायदेशीर मानले जाते. या तेलातील पोषणतत्त्वांमुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास, केसगळती कमी होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळू शकते. पण यापैकी कोणत्या तेलाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल? या प्रश्नामुळेही काही लोकांचा गोंधळ उडतो. 

केसांच्या वाढीसाठी कोणत्या तेलाचा वापर करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

आवळा आणि त्याचे फायदे (Amla Benefits for Hair)

  • आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, खनिज आणि अमिनो अ‍ॅसिडचे तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. या गुणधर्मांमुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते आणि केसांचे तुटणेही कमी होते. 
  • स्कॅल्पवर येणारी खाज आणि कोंड्याची समस्या कमी होते. 
  • आवळ्याच्या तेलाचा नियमित वापर केल्यास केस घनदाट, मजबूत आणि चमकदार होण्यास मदत मिळते. 

आवळ्याच्या तेलाचा केसांसाठी कसा वापर करावा? 

  • आवळ्याचे तेल हलकेसे गरम करावे आणि हलक्या हाताने स्कॅल्पचा मसाज करावा. 
  • मसाजमुळे डोक्याच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल आणि केस मुळासकट मजबूत होण्यास मदत मिळेल.  
  • तेल केसांमध्ये रात्रभर राहू द्यावे आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे.  
  • केस आणि त्वचेमध्ये सकारात्मक बदल अनुभवण्यासाठी डाएटमध्येही आवळ्याचा समावेश करावा.

Hair Growth Faster Tips: केस लांबसडक आणि जाड होतील, सहा महिने फॉलो करा या 5 टिप्स

(नक्की वाचा: Hair Growth Faster Tips: केस लांबसडक आणि जाड होतील, सहा महिने फॉलो करा या 5 टिप्स)

भृंगराज आणि त्याचे फायदे (Bhringraj Benefits for Hair)

आयुर्वेदामध्ये भृंगराज म्हणजे केसांसाठी अमृत मानले जाते. योग्य पद्धतीने भृंगराजचा वापर केल्यास केसांची वाढ होण्यास मदत मिळेल. यातील प्रोटीन आणि अन्य पोषणतत्त्व केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत, यामुळे केसगळती आणि केसांचे तुटणे कमी होऊ शकते.  

भृंगराज तेलाचा वापर कसा करावा?  

  • भृंगराज तेल हलकेसे गरम करावे. 
  • 15 मिनिटे हलक्या हाताने डोक्याच्या भागाचा मसाज करावा आणि 30 मिनिटांसाठी तेल केसांमध्ये राहू द्यावे.
  • अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुऊन घ्या.  
  • दोन-तीन महिने हा उपाय केल्यास केसांमध्ये चांगले बदल अनुभवायला मिळतील.  

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?)

भृंगराज की आवळा, कोणते तेल केसांसाठी योग्य?

  • भृंगराज आणि आवळा या दोन्ही तेलामुळे केसांना वेगवेगळे फायदे मिळतात. 
  • भृंगराज तेलामुळे केसगळती कमी होते आणि केस मुळासकट मजबूत होतात. 
  • आवळा तेलामुळे पोषणतत्त्वांमुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि केसांवर चमक येते. 
  • त्यामुळे दोन्ही तेलांचा वापर केल्यास केसांमध्ये चांगलेच बदल होणार आहेत.  
  • स्वतःच्या आवश्यकतेनुसार तेलाची निवड करावी.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com