जाहिरात

Curry Leaves for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचा कसा करावा वापर? 30 दिवसांत दिसेल फरक

Curry Leaves for Hair: कढीपत्त्यामुळे केसांमध्ये कोणते बदल दिसतील, कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Curry Leaves for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचा कसा करावा वापर? 30 दिवसांत दिसेल फरक
"Curry Leaves for Hair: कढीपत्त्यामुळे केसांना कोणते फायदे मिळतील?"

Curry Leaves for Hair: लांबसडक, घनदाट आणि मजबूत केस मिळवण्यासाठी लोक कित्येक महागड्या स्वरुपाचे उपाय करतात. पण हे उपाय दीर्घकाळ टिकत नाहीत. केसांसाठी इतका मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्याऐवजी काही नैसर्गिक औषधोपचार करणे फायद्याचे ठरू शकते. यामुळे केसांची वाढही होईल आणि केस मजबूतही होतील. कढीपत्त्याची पाने हे केसांसाठी रामबाण उपाय आहेत. कढीपत्त्याच्या पानांचा कोणत्या पद्धतीने वापर केल्यास फायदा होईल, याबाबत न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती जाणून घेऊया...

कढीपत्त्यामुळे केसांना कोणते फायदे मिळतील?

न्युट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर यांनी इन्स्टाग्राम हँडलवर कढीपत्त्याशी संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये शालिनी यांनी सांगितलंय की, हेल्दी हेअर फॉलिकल्ससाठी शरीरामध्ये झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, लोह, कॅल्शिअम यासारख्या मायक्रोन्युट्रिएंट्स आणि प्रोटीनची आवश्यक असते. केसांना या पोषणतत्त्वांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा झाला तर केसगळतीची समस्या कमी होईल. तसेच केसांची वाढही जलदगतीने होईल. शिवाय केस मजबूत आणि घनदाटही होतील. कढीपत्ता या सर्व पोषणतत्त्वांचा नैसर्गिक स्त्रोत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

कढीपत्त्याचे सेवन कसे करावे? 

  • न्युट्रिशनिस्टने पुढे असं सांगितलं की, केसांमध्ये योग्य ते बदल व्हावे, यासाठी ताक किंवा सत्तूपासून तयार केलेल्या पेयांमध्ये कढीपत्त्याचा समावेश करू शकता.
  • मिक्सरमध्ये दही किंवा योगर्टसह थोडेसे पाणी घ्यावे. जवळपास 20 कढीपत्त्याची पाने आणि एक चमचा सत्तू मिक्स करावे. 
  • सर्व मिश्रण योग्य पद्धतीने ब्लेंड करुन घ्या आणि पातळ स्वरुपात मिश्रण वाटावे.  
  • आवश्यकतेनुसार त्यामध्ये मीठ मिक्स करावे. 
  • मिश्रण तयार झाल्यानंतर गाळू नका. कारण कढीपत्त्यातील फायबर केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. 
  • जवळपास 200ml पेय तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता. 
  • शालिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग 30 दिवस हे ड्रिंक प्यायल्यास केस मजबूत होतील आणि केसांची वाढही चांगली होईल. 

योग्य लाइफस्टाइल

  • हेल्दी ड्रिंक पिण्यासह केसांसाठी लाइफस्टाइलमध्ये योग्य ते बदल करणंही आवश्यक आहे. 
  • याकरिता पौष्टिक डाएट, वेळेवर झोपणे आणि ताणतणावापासून दूर राहणे;यासारख्या गोष्टीही कटाक्षाने पाळाव्या.  

Chewing Curry Leaves Benefits: सलग 15 दिवस रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास काय होईल?

(नक्की वाचा: Chewing Curry Leaves Benefits: सलग 15 दिवस रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास काय होईल?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com