
Long Hair Tips In Marathi: केसांच्या वाढीसाठी महिला तसेच पुरुष देखील नको-नको ते उपाय करतात. काही लोक ब्युटी पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटस करतात तर काहीजण महागडे डाएट प्लान देखील फॉलो करतात. पण प्रत्येक ट्रीटमेंट फायदेशीर ठरलेच याची खात्री नसते. शिवाय यामुळे पाण्यासारखा पैसा खर्च होतो ती वेगळीच गोष्ट. याऐवजी रामबाण घरगुती उपाय केला तर केसांच्या आरोग्यामध्ये तुम्हाला मोठे आणि सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. महत्त्वाचे म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे, ज्याद्वारे केसांना आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूंनी फायदा होऊ शकतो. हेअर केअर रुटीनमध्ये मोहरीच्या तेलाचा समावेश करावा, असा सल्ला निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी दिलाय. डॉ. दास यांनी सांगितले की मोहरीच्या तेलामध्ये काही गोष्टी मिक्स करुन केसांवर लावल्यास केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळू शकते.
लांबसडक केसांसाठी मोहरीचे तेल कसे लावावे? (How To Apply Mustard Oil For Long Hair)
- डॉ. मनोज दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांबसडक केसांची इच्छा असेल तर मोहरीचे तेल वापरणे फायदेशीर ठरू शकते.
- मोहरीच्या तेलामध्ये केवळ पाच गोष्टी मिक्स करा आणि मग केसांची भराभर वाढ होण्यास मदत मिळेल.
- सर्वप्रथम 100 मिली प्रमाणात मोहरीचे तेल घ्या. तेलामध्ये 10 ग्रॅम अमरबेल मिक्स करा, अमरबेल गरम तेलामध्ये पूर्णपणे काळी पडत नाही तोवर तेल गरम करणे आवश्यक आहे.
- यानंतर 10 ग्रॅम ओवा, 10 ग्रॅम मेथीचे दाणे, 10 ग्रॅम काळी मिरी मिक्स करा. या सर्व गोष्टी तेलामध्ये व्यवस्थित उकळणे गरजेचे आहे.
- तेलामध्ये सर्व सामग्री उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्यावे. सर्वात शेवटी तेलामध्ये लव्हेंडर अरोमा ऑइल मिक्स करा.
- तेल मुळासकट संपूर्ण केसांना लावा आणि मसाज करा.
- तेलातील पोषणतत्त्वांमुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Hair Care Tips: केसांना तेल लावून झोपणे योग्य की अयोग्य?)
मोहरीचे तेल केसांना आठवड्यातून किती वेळा लावावे तेल? (Mohariche Tel Fayde)
- डॉ. मनोज दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यातून दोन वेळा हे तेल केसांना लावा आणि मसाज करा.
- रात्री झोपण्यापूर्वी किंवा हेअर वॉशपूर्वी दोन तास आधी तेल केसांना लावावे.
- सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे.
- मोहरीच्या तेलामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.
- केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
- केस मजबूत होतील.
- केसांवर नैसर्गिक चमक येईल आणि केस मऊ देखील होतील.
(नक्की वाचा: Hair Growth Tips: डाएटमध्ये या गोष्टींचा करा समावेश, झटपट होईल केसांची वाढ)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world