जाहिरात

Shilajit For Hair Growth: शिलाजीत केसांसाठी चांगलं? केस मजबूत होण्यासाठी आणि पटापट वाढण्यासाठी वापरा ही पद्धत

Shilajit For Hair Growth: शिलाजीत केवळ आरोग्यासाठी नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर ठरू शकते. शिलाजीतमुळे केसांना कोणकोणते फायदे मिळतील, केसांची वाढ कशी होईल, जाणून घेऊया माहिती...

Shilajit For Hair Growth: शिलाजीत केसांसाठी चांगलं? केस मजबूत होण्यासाठी आणि पटापट वाढण्यासाठी वापरा ही पद्धत
Using Shilajit for Hair Growth : केसांच्या वाढीसाठी शिलाजीतचा वापर कसा करावा?

Shilajit For Hair Growth: शिलाजीत हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर केसांसाठी आयुर्वेदिक टॉनिक मानले जाते. याद्वारे केसांना खनिजे, फुल्विक अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. शिलाजीतमुळे केसांचे गळणे कमी होण्यास आणि  केसांची वाढ होण्यास मदत मिळते. 

केस मुळासकट मजबूत कसे होतील? (Shilajit For Hair Growth)

  • शिलाजीतमधील पोषणतत्त्वांमुळे केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते. 
  • केसांचे गळणे कमी होण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते.  
  • कसा करावा वापर: अर्धा चमचा शिलाजीत पावडर कोमट पाण्यात किंवा दुधामध्ये मिक्स करुन रोज सकाळी प्या. 

केसांच्या वाढीसाठी शिलाजीतमुळे कशी मिळते मदत?

  • शिलाजीतमधील ह्युमिक अ‍ॅसिडमुळे स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 
  • यामुळे नवीन केसांची योग्य पद्धतीने वाढ होण्यास मदत मिळते.  
  • शिलाजीत स्कॅल्पवर लावून हलक्या हाताने 10-15 मिनिटांसाठी मसाज करा आणि त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.

कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या होईल दूर 

  • शिलाजीतमुळे केसांना मॉइश्चराइझरही मिळेल. 
  • केस मऊ, चमकदार होतील आणि केसांचे झालेले नुकसान भरुन निघण्यास मदत मिळेल.  
  • आठवड्यातून दोनदा शिलाजीत हेअरमास्क वापरू शकता. 

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?)

कोंड्याच्या समस्येतून होईल सुटका

  • शिलाजीतमधील अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि अँटी बॅक्टेरिया गुणधर्मांमुळे स्कॅल्पची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. 
  • स्कॅल्पला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळते.  
  • नियमित योग्य पद्धतीने वापर केल्यास केस चमकदार होण्यास मदत मिळेल. 

Hair Growth Tips: आवळा की भृंगराज,  केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?

(नक्की वाचा: Hair Growth Tips: आवळा की भृंगराज, केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?)

सुंदर केस मिळवण्यासाठी या गोष्टी देखील लक्षात ठेवा

  • केवळ शुद्ध, प्रयोगशाळेत चाचणी केलेले शिलाजीत वापरावे.
  • स्कॅल्पची त्वचा अति-संवेदनशील असल्यास शिलाजीत वापरण्याआधी पॅच टेस्ट करावी. 
  • शिलाजीत जास्त प्रमाणात वापरल्यास स्कॅल्पच्या त्वचेची जळजळ होऊ शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com