
Hair Growth Tips: केसांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी नेमके कोणते तेल वापरावे; यावरुन प्रत्येकाचा गोंधळ उडतो. आई-आजी म्हणते की केसांसाठी नारळाचे तेल वापरणे उत्तम तर काहीजण हर्बल तेलाचाही पर्याय सुचवतात. केसांवरील चमक टिकून राहण्यासाठी, केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि केसगळतीची समस्या कमी व्हावी, यासाठी योग्य तेलाची निवड करणे अतिशय आवश्यक आहे.
नारळ तेलाचे फायदे (Coconut Oil Benefits)
- नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड असते, यामुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केस मुळासकट मजबूत होतात.
- केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
- स्कॅल्पला येणारी खाज कमी होते आणि ओलावाही मिळतो.

Photo Credit: Pexels
(नक्की वाचा: Shilajit For Hair Growth: शिलाजीत केसांसाठी चांगलं? केस मजबूत होण्यासाठी आणि पटापट वाढण्यासाठी वापरा ही पद्धत)
केसांसाठी हर्बल तेल वापरण्याचे फायदे (Herbal Hair Oil)
- हर्बल तेलामध्ये कडुलिंब, भृंगराज, आवळा यासारख्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो. यामुळे केसगळती, कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.
- हर्बल तेलातील पोषणतत्त्वांमुळे केस मजबूत होण्यास आणि केस वाढण्यास मदत मिळते.
- केसांवरील चमक वाढण्यासाठी आणि केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
- हर्बल तेलातील अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे स्कॅल्पला येणारी खाज-इंफेक्शन कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?)
केसांसाठी कोणते तेल निवडावे? (Herbal Oil vs Coconut Oil For Hair)
- नियमित वापरासाठी नारळाचे तेल वापरावे.
- कोंडा, केसगळती यासारख्या समस्यांसाठी हर्बल तेल वापरू शकता.
- तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाची निवड करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world