जाहिरात

Working Hours : बंगळुरूच्या सीईओंना हवाय 16 तास काम करणारा इंटर्न; कोणत्या देशात सर्वात कमी कामाचे तास?

Lowest Working Hours: भारतात कामाच्या तासाबाबत नेहमी चर्चा होते. मात्र बंगळुरूच्या सीईओंच्या मागण्या पाहून कोणीही हैराण होईल.

Working Hours : बंगळुरूच्या सीईओंना हवाय 16 तास काम करणारा इंटर्न; कोणत्या देशात सर्वात कमी कामाचे तास?

Lowest Working Hours: बंगळुरूच्या एका कंपनीतील एआय स्टार्टअपच्या सीईओंनी (Runnable CEO Umesh Kumar) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी नोकरी आणि इंटर्नच्या नियुक्तीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. मात्र नोकरीत कामाचे तास पाहून यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांना एक असा इंटर्न हवाय जो आठवड्यात ६० ते ८० तास करण्यास तयार असेल. इतकच नाही त्यांनी इंटर्नसाठी अशा अनेक मागण्या ठेवल्यात, जे पाहून कुणालाही घेरी येईल.  

८० तास काम करणाऱ्या इंटर्नची गरज

उमेश कुमार यांच्या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी यावर म्हटलंय की आठवड्यात ६० ते ८० तास काम करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. एका युजरने लिहिलंय, ८० तास काम करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. ८० तास आठवड्याला म्हणजे दिवसाला १६ तास काम करावं लागेल आणि शनिवार-रविवार सुट्टी. एका युजरने लिहिलंय, तुम्ही नारायण मूर्ती आहात का? ऑफिसमधील कामाचे तास किती असावेत यावर नेहमी चर्चा होत असते, मात्र असेही काही देश आहेत जिथं कामाबरोबरच वर्क लाइफ बॅलेन्सकडेही लक्ष दिलं जातं. 

Dadasaheb Bhagat : ऑफिस बॉय ते CEO; दहावी पास तरुणाने उभारली कोट्यवधींची कंपनी

नक्की वाचा - Dadasaheb Bhagat : ऑफिस बॉय ते CEO; दहावी पास तरुणाने उभारली कोट्यवधींची कंपनी

विविध आंतरराष्ट्रीय संघटना (OECD) च्या आकड्यांनुसार, जगभरात आठवड्यात सर्वात कमी कामाचे तास (Lowest Average Weekly Working Hours) असणाऱ्या देशांमध्ये नेदरलँड्सचं  (Netherlands) नाव घेतलं जातं. ताज्या आकड्यांनुसार, नेदरलँड्समध्ये एका आठवड्यात कामाचे तास इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. येथे आठवड्याचे कामाचे तास ३० चे ३२ च्या जवळपास आहे. 

अन्य युरोपीय देश उदा. नॉर्वे आणि डेन्मार्कमध्येही कामाचे तास कमी आहे. हे देश काम आणि वर्क लाइफ बॅलेन्स (Work-Life Balance)  ला महत्त्व देणाऱ्या नॉर्डिक (Nordic) मॉडल दर्शवते. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com