
Chewing Food 32 Times Benefits: जेवणाचा प्रत्येक खास व्यवस्थित चावून मग गिळावा, असा सल्ला तुम्हाला तुमच्या आई-आजीने नक्कीच दिला असेल. लहानपणी तुम्हाला आजी-आईचा सल्ला सतत ऐकणं रटाळवाणं वाटलं असावे. पण हळूहळू जेवणे तसेच प्रत्येक घास नीट चावून खाणे आरोग्यासाठी औषधाप्रमाणे काम करते, असे तज्ज्ञमंडळी म्हणणंय. धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच प्रत्येक गोष्ट घाईघाईत करण्याची सवय झालीय. वेळेचे योग्य नियोजन होत नसल्याने खाणेपिणे देखील घाईघाईमध्ये केले जातंय. यामुळे पचनप्रक्रिया, शरीराचे वजन आणि हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
जेवणाचा प्रत्येक घास 32 वेळा चावून का खावा (Chew Your Food 32 Times)
आयुर्वेदानुसार जेवणाचा प्रत्येक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. यामुळे खाल्लेल्या अन्नाद्वारे पोषणतत्त्व शोषून घेण्यास शरीराला योग्य वेळ मिळतो. खाद्यपदार्थांचे पटापट सेवन केले तर पोट भरल्याचे संकते मेंदूला मिळत नाहीत. परिणामी पोटामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न जाण्याची शक्यता आहे. हळूहळू खाल्ल्यास भूकेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते आणि वजन वाढीची समस्या उद्भवत नाही.

पौष्टिक आहाराचे सेवन: मेंदू आणि पोटाचे नाते (Right Way To Eat For Digestion)
हळूहळू चावून खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारते, कारण लाळेतील एंझाइम अन्नाचे विघटन करण्यास मदत करतात. याउलट पटापट जेवण केल्यास या प्रक्रियेवर परिणाम होतात, ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. खाद्यपदार्थांचे सेवन करताना केवळ खाण्यावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते आणि अतिरिक्त जेवण पोटामध्ये जात नाही.
(नक्की वाचा: How To Eat Egg: अंडे खाण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? ऑमलेट तयार करावे, उकडून की कच्चे खावे?)

एक खास 32 चावून खाण्याचे फायदे (Proper Chewing For Better Digestion)
- वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- पचन आणि शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळते.
- छातीमध्ये जळजळ होणे आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
- हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
- पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Flat Tummy Exercise: C-सेक्शन डिलिव्हरीनंतर सुटलेले पोट लगेचच जाईल आत, फॉलो करा 5 टिप्स)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world