
चहाचे आरोग्यासाठी काही फायदे आहेत तसे त्याचे अनेक तोटेही आहे. शिवाय चहा कधी प्यायला पाहीजे आणी कधी नाही याचा ही एक नियम आहे. अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी चहा पितात. पण उपाशी पोटी चहा प्यायल्याने पोटात ऍसिडिटी, गॅस आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी किंवा नारळाचे पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे अनोशा पोटी कधीही चहा पिऊ नये असं सांगितलं जातं. ते आरोग्यासही धोकादायक ठरू शकते.
नक्की वाचा - सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे काय?
जेवण झाल्यावर लगेच चहा पिणे टाळा
जेवण झाल्यावर लगेच चहा प्यायल्याने शरीरातील लोह आणि इतर खनिजे शोषण्याची (Absorption) क्षमता कमी होते. यामुळे दीर्घकाळात ॲनिमिया आणि अशक्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, जेवणानंतर 30-45 मिनिटांनीच चहा पिण्याचा प्रयत्न करा. लगेचच जेवणानंतर चहा पिणे आरोग्यासाठी धोकायदायक ठरू शकते.
चहा पिण्याची योग्य वेळ
सकाळचा नाश्ता झाल्यावर किंवा दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान चहा पिणे उत्तम मानले जाते. या वेळेत चहा प्यायल्याने तुमचा मूड चांगला होतो. ऊर्जा वाढते आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला जर चहा प्यायचाच असेल तर दुपारी तीन ते पाच या काळात प्या. त्याचे काही ही दुष्परिणाम तुमच्या शरिरावर होत नाहीत.
चहाचे प्रमाण मर्यादित ठेवा
दिवसात 2-3 कपपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी योग्य नाही. जास्त चहामुळे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), झोपेची समस्या आणि पोटात ऍसिडिटी वाढू शकते. ग्रीन टी किंवा हर्बल टी हे आरोग्यदायी पर्याय असू शकतात. त्यामुळे तुम्हाला चहा सारखा हवाच असेल तर ग्रीन टी आणि हर्बल टी हे त्याचे चांगले पर्याय आहेत.
रात्री चहा पिणे टाळा
चहामध्ये असलेले कॅफीन मेंदूला सक्रिय करते. जर तुम्ही रात्री चहा प्यायला, तर झोप येण्यास त्रास होऊ शकतो. तुम्हाला चहा प्यायल्याने झोप येत नाही. त्यामुळे झोपेची गुणवत्ताही खराब होऊ शकते. अनेक वेळा रात्री झोप येवू नये म्हणून चहा पिणारे अनेक लोक आहे. त्यात रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
नक्की वाचा - Orange juice: सकाळी रिकाम्या पोटी संत्र्याचा रस पिण्याचे काय आहेत फायदे?
सल्ल्यासह ही माहिती केवळ सामान्य माहिती पुरवते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world