Tea Benefits And Side Effects: डोकं दुखलं, चहा प्या, मूड नाहीय, चहा प्या... काही लोक औषधाप्रमाणे चहा पितात. पण जास्त प्रमाणात चहा पिणे हानिकारक ठरते. चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन यासारखे तत्त्व शरीरासाठी अपायकारक असतात. चहा पिण्याची पद्धत, चहा पिण्याची योग्य वेळ, त्याचे प्रमाण या सर्व गोष्टीवरुनच चहा तुमच्यासाठी अमृत आहे की विष? हे ठरेल. रिकाम्या पोटी चहा प्यावा का? दुधाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल का? चहामुळे आपण आजारी होऊ शकतो का? यासह महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या लेखाद्वारे जाणून घेऊया...
चहासंदर्भात विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions about Tea
1. एका दिवसात किती कप चहा प्यावा? | How many cups of tea should you drink in a day?
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिवसभरात एक किंवा दोन कप चहा प्यावा. 300 मिलीग्रॅम कॅफीनचे प्रमाण दिवसभरासाठी सुरक्षित मानले जाते. जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास अस्वस्थ वाटणे, झोप न येणे, अॅसिडिटी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मर्यादित स्वरुपात चहा प्यावा.
2. चहाची प्रकृती उष्ण असते की थंड? | Is tea hot or cold?
चहाची प्रकृती उष्ण मानली जाते कारण यामध्ये कॅफीनसह काही उत्तेजक घटकांचा समावेश आहे, त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. अतिशय गरम चहा पिणे टाळावे, कारण यामुळे अन्ननलिकेच्या पेशींचे नुकसान होते.
3. चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास नुकसान होते का? | Is it harmful to drink water immediately after drinking tea?
चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. दातांवरील थराचे नुकसान होते आणि दातांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. पचनप्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे अपचन, अॅसिडिटी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
4. चहा प्यायल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? | How long after drinking tea should you drink water?
चहा प्यायल्यानंतर कमीत कमी 20 ते 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. यामुळे दात आणि पोटाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत. पण तुम्हाला तहान लागली असेल तर पाण्याने चुळ भरुन तोंड स्वच्छ करावे आणि त्यानंतर थोडेसे पाणी प्यावे.
5. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यावा का? | Should you drink tea on an empty stomach in the morning?
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटामध्ये अॅसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक अॅसिडचा स्त्राव वाढू शकतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अॅसिडिटी, पोटामध्ये जळजळ होणे, गॅस्ट्रिक अल्सर यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
6. चहाला पौष्टिक पर्याय कोणते? | What are nutritious alternatives to tea?
नेहमीचा चहा पिणे बंद करायचे असेल तर डाएटमध्ये कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून तयार केला जाणार चहा पिऊ शकता. यामध्ये काळा चहा, ग्रीन टी, व्हाइट टी यासारख्या पौष्टिक पर्यायाचा समावेश आहे. भारतामध्ये काही भागांमध्ये आजही काळा चहा प्यायला जातो.
7. चहा पिणे बंद केल्यास कोणते फायदे मिळतील? | What are the benefits of stopping drinking tea?
चहा पिणे बंद केल्यास अस्वस्थता, अॅसिडिटी, डोकेदुखी, पोटात होणारी जळजळ, दातांच्या समस्या यासारख्या समस्यांपासून सुटका होईल. तसेच शरीरातील अतिरिक्त कॅलरीज घटतील आणि झोप देखील चांगली येईल.
8. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? | What is the best time to drink tea?
चहा पिण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे जेवणानंतर एक ते दोन तासांनंतरची असते. रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता करतानाही चहा पिऊ शकता.
9. चहा तयार केल्यानंतर किती तासांत प्यावा? | How many hours after making tea should you drink it?
चहा तयार केल्यानंतर कित्येक तास तसाच ठेवणे किंवा वारंवार गरम करुन पिणे या सवयी आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जातात. चहा तयार केल्यानंतर ताजा-ताजा किंवा तासाभरामध्ये प्यावा. चहा पिण्यास उशीर केल्यास त्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया तयार होतात आणि कडवटपणा वाढतो.
10. दुधाविना चहा पिण्याचे फायदे | Benefits of drinking tea without milk
दुधाशिवाय चहा पिणे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. चहामध्ये दूध ओतल्यास यातील अँटी-ऑक्सिडंट्सची पातळी घटते. काळा चहा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, शिवाय शरीराची चयापचयाची गती जलद होते आणि वजनही कमी होण्यास मदत मिळते.
11. चहाऐवजी काय प्यावे?
चहाऐवजी कित्येक पौष्टिक पर्यायांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. नेहमीच्या चहाऐवजी आल्याचे पाणी, लिंबू पाणी, पुदिन्याचे पाणी, नारळ पाणी, ताक, फळांचा रस, भाज्यांचा रस यासारख्या गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता.
(नक्की वाचा: Kidney Stones Treatment: मूतखड्यांच्या समस्येतून पटकन सुटका हवीय? या फळाचा काढा प्या, वाचा फायदे)
12. चहामुळे कोणत्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो?जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास कित्येक गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. कॅफीनमुळे झोप कमी होते, हाय ब्लडप्रेशर, हृदयाचे ठोके अनियमित होणे, अॅसिडिटी यासारख्या गोष्टींचा धोका वाढू शकतो.
13. चहामध्ये कोणत्या हानिकारक तत्त्वांचा समावेश असतो? | What harmful elements does tea contain?कॅफीन आणि टॅनिन हे चहातील हानिकारक तत्त्व मानले जातात. या घटकांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास हृदय आणि मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतात.
14. चहा कधी पिऊ नये? | Chaha Kadhi Pyavaसकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये, कारण अॅसिडिटी होते. जेवल्यानंतर चहा पिणे टाळावे, यामुळे लोहाचे घटक शोषून घेण्याच्या शरीराच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम होतात. रात्री झोपण्यापूर्वी चहा पिऊ नये कारण झोपेवर परिणाम होतात.
15. 30 दिवस चहा न प्यायल्यास काय होईल? | What Happens When You Stop Drinking Tea For 30 Daysचहा पिणे बंद केल्यास सुरुवातीस तुम्हाला डोकेदुखी, थकवा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल. पण आठवडाभरानंतर चांगली झोप येईल, अॅसिडिटी कमी होईल, शारीरिक ऊर्जा टिकून राहील, चयापचयाची गती जलद होईल, वजन कमी होण्यास मदत मिळेल, त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतील.
16. चहामध्ये तूप मिक्स करुन प्यायल्यास काय होईल? | Ghee Tea Benefitsपर्वतीय भागांमध्ये राहणारे लोक चहामध्ये तूप मिक्स करुन पितात. यामुळे चहाचा कडवटपणा कमी होतो, अॅसिडिटीची समस्या कमी होईल. पण हे काही आजारावरील उपाय नाहीय.
(नक्की वाचा: Curd Benefits: दही कोणत्या महिन्यात खाऊ नये, दही खाण्याची योग्य वेळ कोणती? नुकसान-फायद्यांसह जाणून घ्या 8 FAQs)
17. चहा प्यायल्यानंतर काय खाऊ नये? | Chaha Pyaylyanantar Kay Khau Nayeचहा प्यायल्यानंतर थंड पाणी, आईस्क्रीम यासारख्या थंड गोष्टी खाऊ नये. यामुळे दात आणि पोटाचे नुकसान होते.
18. कोणता चहा आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे? | Which tea is more harmful to health?जास्त प्रमाणात साखर, क्रीम किंवा कृत्रिम फ्लेव्हर्सचा समावेश असणारा चहा पिणे टाळावे. तसेच वारंवार गरम केलेलाही चहा पिऊ नये. यामुळे अॅसिडिटी तसेच पोटाच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतात.
19. चहा प्यायल्यास वजन कमी होते का? | Tea Weight Loss Tipsकाळा चहा किंवा ग्रीन टी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. ग्रीन टीमधील कॅटेचिन तत्त्वामुळे चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेत आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्स घटण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Raw Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते, लसणाचं कोणी करावं सेवन? जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत)
20. गुळाचा चहा पिण्याचे फायदे? | Jaggery Tea Benefits In Marathiगुळाच्या चहामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. साखरेच्या तुलनेत गूळ पौष्टिक पर्याय आहे. गुळामध्ये लोह आणि खनिजांचा समावेश आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world


