Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल

Better Sleep Tips: रात्री झोप येत नसल्यास शरीराचे काही अवयव दाबल्यास चांगली आणि शांत झोप येण्यास मदत मिळेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Better Sleep Tips: शरीराच्या कोणत्या अवयवांवर दाब दिल्याने झोप येते?
Canva

Better Sleep Tips: खराब लाइफस्टाइल, तणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे झोपेवर परिणाम होणे अतिशय सामान्य बाब आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीराचे कित्येक प्रकारे नुकसान होऊ शकते आणि संपूर्ण दिवस थकवा देखील जाणवेल. तसेच गंभीर आजारांचा धोकाही वाढेल. शरीरामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी6ची कमतरता निर्माण झाल्यास झोपेवर दुष्परिणाम होतात. रात्रभर कुस बदलूनही झोप येत नाही आणि दुसऱ्या दिवशी शरीराची कार्यप्रणालीही प्रभावित होते. रात्री पटकन झोप यावी, यासाठी शरीराचे काही अवयव आणि पॉइंट्स दाबल्यास झोप चांगली येईल. नियमित स्वरुपात हे उपाय केल्यास निद्रानाशाची समस्याही दूर होईल. 

आयब्रोच्या मधील जागा  

आयब्रोच्या मधोमध असणाऱ्या जागेवर बोटांच्या किंवा अंगठ्याच्या मदतीने हलका दाब द्यावा. यामुळे चांगली झोप येण्यास मदत मिळेल. मानसिक ताणतणाव, हाय बीपी यासारख्या समस्यांनी ग्रस्त असणाऱ्यांनी हा उपाय करावा.  

कानाच्या मागील जागा

झोप न येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर कानाच्या मागील जागेवर दाब द्यावा. डोकेदुखीमुळे झोप येत नसल्यास 10 ते 20 मिनिटे हा उपाय करावा. 

मनगट

मानसिक शांतता आणि चांगली झोप यावी, यासाठी मनगटाच्या पॉइंटवर दाब द्या. हा उपाय केल्यास तुम्हाला वारंवार कुस बदलण्याची आवश्यकता भासणार नाही. 

Advertisement

मनगट

मानेचा खालील भाग

मानेचा खालील भाग अंगठ्याने दाबल्यास चांगली झोप येईल. या उपायामुळे तुम्हाला आरामही मिळेल. 

(नक्की वाचा: Coriander Water Benefits: सलग 15 दिवस धण्याचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये होईल मोठा बदल)

झोपण्यापूर्वी या चूक मुळीच करू नका

  • झोपण्यापूर्वी चहा-कॉफी यासारखे पेय पिणे टाळावे.
  • यातील कॅफिनमुळे झोपेवर दुष्परिणाम होतात. 
  • झोपण्यापूर्वी मोबाइल, लॅपटॉप वापरू नये.
  • गॅजेट्समधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळेही झोपेवर परिणाम होतात. 

Advertisement

(नक्की वाचा: Lemon Benefits: रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे का, दिवसभरात किती लिंबांचं सेवन करावे, फायद्या-तोट्यांसह 18 प्रश्नांची उत्तर वाचा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article