जाहिरात

Kidney Risk in Hair Dye : हेअर डायमुळे मूत्रपिंडाचं आरोग्य धोक्यात, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

किडनीचा त्रासापासून बचाव करू इच्छित असाल तर तुम्ही काही पाऊलं उचलणं आवश्यक आहे.

Kidney Risk in Hair Dye : हेअर डायमुळे मूत्रपिंडाचं आरोग्य धोक्यात, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Hair Dye : सध्या हेअर डाय किंवा कलर करणं लाखो लोकांच्या ब्यूटी रुटीनचा एक भाग झाला आहे. कधी पांढरे केस लपविण्यासाठी तर कधी ट्रेंडी लुक मिळविण्यासाठी हेअर डाय किंवा कलरचा उपयोग केला जातो. यामुळे केवळ लुक बदलत नाही तर हेअर डायमधील रसायनांचा आरोग्यावर परिणामी होतो. विशेषत: मूत्रपिंडावर. जाणून घेऊया याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.

किडनीचं आरोग्य धोक्यात...

किडनी आपल्या शरीरात नैसर्गिक फिल्टरचं काम करते. ज्यामुळे रक्तातील विषारी तत्व आणि अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात. जेव्हा आपण हेअर डाय लावतो त्यावेळी हेअर डायमधील केमिकल केसांच्या मुळांच्या माध्यमातून शरीरात जाऊ शकतात आणि रक्तप्रवाहात पोहोचतात. विशेषत: पॅरा-फिनाइलेंडायमीन आणि अमीनो फिनॉल्ससारख्या केमिकल धोकादायक आहे. हे घटक सिंथेटिक डायमध्ये आढळून येतात. डायचा उपयोग वारंवार आणि चुकीच्या पद्धतीने केला तर याचा मूत्रपिंडाच्या फिल्टरिंगच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि सूज किंवा इंफ्लेमेशन निर्माण करतं. Journal of the Pakistan Medical Association मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अधिक प्रमाणात पीपीडी संपर्कात आल्याने किडनीची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. 

नक्की वाचा - Hair Growth Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबते? न्युट्रिशनिस्टने 5 ब्लड टेस्ट करण्याचा दिला सल्ला

कोणी काळजी घेण्याची आवश्यकता? 

ज्या व्यक्तींना क्रॉनिक किडनी किंवा रक्तदाबाचा त्रास असेल अशांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मधुमेही रुग्ण, त्वचा संवेदनशील असणाफ्यांनीही डाय लावताना काळजी घ्यायला हवी. 

काय पर्याय?

किडनीचा त्रासापासून बचाव करू इच्छित असाल तर तुम्ही काही पाऊलं उचलणं आवश्यक आहे. ज्यामध्ये नैसर्गिक डायचा वापर वाढवावा. अमोनिया फ्री आणि पीपीडी-फ्री प्रॉडक्ट खरेगी करावे आणि हर्बल टिंट्स किंवा सेमी परमानेंट कलरचा वापर करावेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com