
Hair dye side effects : पांढरे केस लपविण्यासाठी तसेच तरुण दिसण्यासाठी बरेच लोक रासायनिक घटकांचा समावेश असलेले केसांचे रंग वापरतात. जरी हे रंग कॉस्मेटिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असले, तरी वारंवार आणि दीर्घकाळ वापरल्याने हे आरोग्यासंबंधीत धोके निर्माण करु शकतात. बहुतेक कृत्रिम केसांच्या रंगांमध्ये पॅराफेनिलेनेडायमाइन (पीपीडी), अमोनिया, रेसोर्सिनॉल आणि लीड एसीटेट सारखी रसायने असतात. हे टाळूद्वारे शोषले जाऊ शकतात किंवा श्वासाद्वारे आत घेतले जाऊ शकतात, हळूहळू शरीरात जमा होतात आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये सहभागी असलेल्या अवयवांवर, विशेषतः मूत्रपिंडांवर परिणाम करतात, असं झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. दीपा उसुलुमार्टी यांनी सांगितलं. (Hair dye has adverse effects on the kidneys)
मूत्रपिंडाचे मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी आणि कचरा (टाकाऊ पदार्थ) बाहेर टाकणे. केसांच्या रंगांमधील रसायनांच्या वारंवार संपर्कामुळे मूत्रपिंडावर अधिक भार येऊन त्यांना अधिक काम करण्यास भाग पाडले जाऊ शकते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. कालांतराने, यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.
नक्की वाचा - Castor Oil Benefits: एरंडेल तेलाचे 10 जबरदस्त फायदे, केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्यासाठी होईल फायदा
काही व्यक्तींमध्ये पीपीडीमुळे अॅलर्जी आणि रंगपेशींना इजा होते. अमोनिया आणि रेसोर्सिनॉल त्वचा आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करतात. काही हेअर डाय उत्पादनांमध्ये, विशेषतः जे रंग हळू-हळू बदलण्यासाठी (progressive hair dyes) वापरले जातात, त्यात रंग जोडणारा घटक म्हणून लेड एसीटेटचा वापर केला जातो त्याचा परिणाम अवयवांवर होतो. जरी हे रंग परवडणारे आणि व्यापकपणे उपलब्ध असले तरी, दीर्घकालीन वापरामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते, असं डॉ. दीपा उसुलुमार्टी यांनी सांगितलं.
जोखीम कमी करण्यासाठी, पीपीडी, अमोनिया किंवा तत्सम रसायने असलेले केसांचे रंग टाळा. अशावेळी प्लांट बेस किंवा हर्बल पर्याय निवडा आणि नेहमी त्यावरील लेबल तपासा. केसांना रंग करताना असाल तर हॅड ग्लोव्ह्ज वापरा आणि त्वचेचा कमीत कमी संपर्क येईल याचा प्रयत्न करा. हायड्रेटेड राहिल्याने मूत्रपिंड अधिक कार्यक्षमतेने विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते आणि रासायनिक केस उत्पादनांचा वारंवार वापर करणाऱ्यांसाठी नियमित मूत्रपिंड कार्य तपासण्यासाठी विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.
योग्य जीवनशैली बाळगणे
आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहाराचे सेवन करा. सौंदर्यप्रसाधनांमध्ये अनावश्यक रासायनिक घटकांशी संपर्क टाळा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचे रक्षण करा. तुमच्या डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या व नियमित तपासणी करा.
प्रत्येकाला आपण चांगले दिसावे असे वाटते मात्र त्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याशी तडजोड करू नका. मूत्रपिंडास होणारे नुकसान हे अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाही. तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांबद्दल जागरूक राहणे आणि त्यादृष्टीने सक्रिय पाऊल उचलणे गरजेचे आहे.
त्वचा उजळविणारे क्रीम्स
- त्वचा उजळविणाऱ्या अनेक क्रीम्समध्ये पारा, हायड्रोक्विनोन किंवा स्टिरॉइड्स असतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. विशेषतः पारा हा एक जड धातू आहे जो मूत्रपिंडात साचून राहु शकतो, ज्यामुळे कालांतराने मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. या क्रीम्सचा वापर अनेकदा वैद्यकीय देखरेखीशिवाय केला जातो.
- दीर्घकालीन वापराने पाऱ्याची विषबाधा होऊ शकते, ज्यामध्ये थकवा येणे, सूज किंवा लघवीमध्ये बदल यासारख्या मूत्रपिंडाचे नुकसान होणारी लक्षणे आढळून येतात. जर अशा क्रीम्स वारंवार वापरल्या गेल्या तर हा धोका आणखी वाढतो.
- सुरक्षित राहण्यासाठी, त्वचा उजळविणारी उत्पादने टाळा, विशेषतः ऑनलाइन किंवा अनौपचारिक बाजारातून खरेदी केलेल्या उत्पादनांचा वापर टाळा. त्वचाविकार तज्ज्ञांची सल्ल्याशिवाय कोणतेही क्रीम्स वापरु नका आणि सुरक्षित पर्यायांसाठी त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण करा
- पीपीडी, अमोनिया, पारा किंवा स्टिरॉइड्स यांचा समावेश असलेले केस आणि त्वचेची उत्पादनांचा वापर टाळा
- हायड्रेटेड रहा आणि आहारातील मिठाचे प्रमाण मर्यादीत करा आणि संतुलित आहाराचे सेवन करा.
- जर तुम्ही ही उत्पादने वारंवार वापरत असाल तर नियमित मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी करा.
- गरज भासल्यास वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला घ्या
- तुमच्या मूत्रपिंडांच्या कार्याचे रक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही उत्पादनांचा वापर करण्यापुर्वी त्याविषयी पुरेशी माहिती व तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world