जाहिरात

Christmas 2024 Wishes: मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मराठीतून पाठवा नाताळच्या खास शुभेच्छा  

Merry Christmas 2024 Wishes: खास ख्रिसमस सणानिमित्त मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मराठी भाषेतून शुभेच्छा पाठवून सण साजरा करा.

Christmas 2024 Wishes: मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मराठीतून पाठवा नाताळच्या खास शुभेच्छा  

Christmas 2024 Wishes: नाताळ सण म्हणजेच ख्रिसमस दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांच्या वाढदिवसानिमित्त ख्रिसमस (Christmas 2024) साजरा केला जातो. या सणानिमित्त काही आठवड्यांपूर्वीपासूनच तयारी केली जाते. घरांसह ख्रिसमस ट्रीची देखील सजावट केली जाते. या दिवशी मित्रपरिवार-नातेवाईक एकमेकांना भेटवस्तू देखील देतात. लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. काही ठिकाणी ख्रिसमस साजरा करण्यासाठी थीम आऊटफिट्स, थीम पार्टी, थीम मेकअप अशा वेगवेगळ्या गोष्टींचे आयोजन केले जाते. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच सीक्रेट सांता हा गेम देखील खेळतात. ख्रिसमस सणानिमित्त शुभेच्छा पाठवायलाही विसरू नका. तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना ख्रिसमसचे मेसेज (Christmas 2024 Wishes In Marathi), फोटो पाठवून नक्की शुभेच्छा द्या. हे मेसेज वाचून आणि फोटो पाहून त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ख्रिसमसचे मेसेज  | नाताळ सणाचे मेसेज | Christmas Wishes 

सर्वांच्या मनात असावे सर्वांसाठी प्रेम 
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी घेऊन येवो आनंदाचे क्षण
याच अपेक्षाने विसरू या सर्व दुःख 
हसतमुखाने नाताळ सणाचे करूया स्वागत 
Merry Christmas 2024 

(नक्की वाचा: 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्राचा रोज सकाळी 24 मिनिटे करा जप, जीवनात होतील 5 मोठे बदल)

ज्या क्षणाची पाहत होतो वाट
डिसेंबर महिना घेऊन आला ख्रिसमस सण
सर्वांना ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा   
Merry Christmas 2024 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

हसतमुखाने ख्रिसमस सण करा साजरा
जीवनात येईल नव्या सुखाची लहर 
दुःख-वेदना विसरुन सर्वांची घ्या गळाभेट 
प्रेमाने साजरा करा नाताळ सण  
Merry Christmas 2024

(नक्की वाचा: Holidays List 2025: नवे वर्ष 2025मध्ये मिळणार इतके दिवस सुटी, ही यादी पाहून करा प्लानिंग)

रोषणाईने सजेल घर आणि अंगण 
एकमेकांची गळाभेट घेऊन साजरा करा सण
ख्रिसमस स्वतःसोबत घेऊन येत आहे
खूप सारे सुख, उत्साह आणि आनंद 
Merry Christmas 2024 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

यंदाचा ख्रिसमस सण आनंदात करा सेलिब्रेट
ख्रिसमस ट्रीप्रमाणे तुमचे आयुष्य होवो रंगीत
ताऱ्यांप्रमाणे चमको तुमचे भविष्य  
Merry Christmas 2024 

लहान मुलांचा दिवस, भेटवस्तूंचा दिन
नाताळबाबा आला, तुम्हाला काहीतरी गिफ्ट नक्कीच देऊन जाणार 
विसरू नका त्याला थँक यू म्हणायला
Merry Christmas 2024 

नाताळ सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 
Merry Christmas 2024 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com