
सनासुदीच्या तोंडावर आणि मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 6 रुपयांनी महाग झाला आहे. आजपासून 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 6 रुपयांनी महाग झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 5.50 रुपयांनी वाढली आहे. म्हणजे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1749 रुपयांवरून 1755.50 रुपयांवर गेली आहे. दिल्लीत त्याची किंमत 6 रुपयांनी वाढून 1803 रुये झाली. पूर्वी हे दर 1797 रुपये होते.
(नक्की वाचा- नोएडातील न्यूज चॅनलमध्ये IIT बाबाला मारहाण, Video शेअर करत केले अनेक आरोप)
कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 6 रुपयांनी वाढून 1913 रुपयांवर गेली आहे. जी याआधी 1907 रुपये होती. चेन्नईमध्ये सिलेंडर 1965 रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
(नक्की वाचा- Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)
घरगुती गॅस सिलेंडरचे दर
- मुंबई- 802.50 रुपये
- दिल्ली- 803 रुपये
- कोलकाता- 829 रुपये
- चेन्नई- 818.50 रुपये
- पटना- 901 रुपये
- जयपूर- 806.50 रुपये
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world