Constipation Remedies: धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश लोक पोटाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असतात. जंक फुड, फास्ट फुड, व्यायाम न करणे, अपुरी झोप अशा अनेक गोष्टी याकरिता कारणीभूत असू शकतात. 10 पैकी सात लोक बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्यांचा सामना करतात. ज्यामुळे चिडचिडेपणा, पोटदुखी यासारखे त्रासही उद्भवतात. शौचास पूर्ण न झाल्याने संपूर्ण दिवसाचे गणित बिघडते, ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. तुम्ही देखील पोट स्वच्छ होण्यासाठी सीरिप तसेच गोळ्या घेऊन कंटाळले आहात का? काहीही आराम मिळत नाहीय का? तर एक साधासोपा आणि रामबाण उपाय जाणून घेऊया. बद्धकोष्ठतेसह पोटाशी संबंधित अन्य समस्यांवर एरंडेल तेल उत्तमरित्या काम करते. जाणून घेऊया न्युट्रिशनिस्ट नमिता नानल यांनी सांगितलेले उपाय ...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एरंडेल तेलाचा आहारामध्ये कसा करावा समावेश?
- गरम पाण्यामध्ये एक चमचा एरंडेल तेलासह चिमूटभर सूंठ मिक्स करावी आणि ते प्यावे.
- केवळ एरंडेल तेल प्यायल्यास काहींना मळमळू शकते, ही समस्या टाळण्यासाठी सूंठ मिक्स करण्याचा सल्ला दिला जातो.
- पोळीचे किंवा भाकरीचे कणिक मळताना त्यामध्ये अर्धा ते एक चमचा एरंडेल तेल मिक्स करावे. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते.
- गॅसची समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यामध्ये एक चमचा एरंडेल तेल, एक चमचा बडिशेप पावडर, चिमूटभर सूंठ पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते पाणी प्यावे.
(नक्की वाचा: Morning Walk vs Evening walk : कोणत्या वेळेस चालणे ठरेल फायदेशीर, सकाळी की संध्याकाळी? )
आहारामध्ये किती प्रमाणात एरंडेल तेल वापरावे?
- पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास डाएटमध्ये एरंडेल तेलाचा योग्य प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. एरंडेल तेलाचा वापर गरजेपेक्षा जास्त केल्यास पोटाचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच एरंडेल तेलाचे प्रमाण फार महत्त्वाचे आहे.
- आवश्यकतेपेक्षा अधिक एरंडेल तेल वापरल्यास जुलाब होण्याची शक्यता आहे.
- पोटाचे आरोग्य बिघडू शकते.
- आठ किंवा 15 दिवसातून एकदा एरंडेल तेलाचा डाएटमध्ये समावेश करावा.
- पोट स्वच्छ होत नसेल तर दोन चमचे एरंडेल तेलाचा डाएटमध्ये समावेश करावा. पण दोन चमच्याहून अधिक प्रमाणात एरंडेल तेलाचा वापर करणे टाळावे.
(नक्की वाचा: Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world