जाहिरात

D Mart News:डी मार्टचा जानेवारी धमाका! काय आहेत विशेष ऑफर?, ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊस

जे ग्राहक स्टोअरमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी होम डिलिव्हरीचा पर्यायही खुला आहे.

D Mart News:डी मार्टचा जानेवारी धमाका! काय आहेत विशेष ऑफर?, ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊस
  • डीमार्टने मकर संक्रांतीच्या सणानिमित्त ग्राहकांसाठी विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत
  • तीळ, गूळ आणि शेंगदाणे यांसारख्या सणासंबंधी वस्तूंवर दहा ते वीस टक्के सूट मिळणार आहे
  • रेडीमेड तीळ लाडू आणि चिक्कीवर एक खरेदी केल्यावर एक मोफत मिळेल अशी ऑफर उपलब्ध आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

DMart News: नवीन वर्ष सुरू झालं आहे. नवीन वर्षात अनेक जण वेगवेगळी शॉपिंग करत असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी ऑफर ही दिल्या जातात. शिवाय जानेवारी महिन्यात पहिला सण ही येत आहे. त्या दृष्टीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही कंपन्या आतापासूनच सरसावल्या आहेत. हा पहिला सण म्हणजे  मकर संक्रांतीचा सण आहे. याचे औचित्य साधून किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीची साखळी असलेल्या 'डीमार्ट'ने (DMart) ग्राहकांसाठी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. जानेवारी 2026 च्या या विशेष सेलमध्ये सणासुदीच्या साहित्यापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांची खऱ्या अर्थाने मजा होणार आहे. 

नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?

मकर संक्रांतीसाठी लागणारे मुख्य साहित्य, म्हणजेच तीळ, गूळ आणि शेंगदाणे यांच्या खरेदीवर 10% ते 20% पर्यंत सवलत उपलब्ध आहे. 'डीमार्ट प्रेमिया' अंतर्गत उपलब्ध असलेल्या रेडीमेड तीळ लाडू आणि चिक्कीवर 'Buy 1 Get 1 Free' सारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नोकरदार वर्गाची मोठी सोय होणार आहे. मध्यम वर्गाचा अलिकडच्या काळात डीमार्टमधून खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे याला डोळ्या समोर ठेवून वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. त्याला प्रतिसाद ही दिसून येतो. त्यामुळे कधी ही डीमार्टमध्ये गर्दी दिसून येते.

नक्की वाचा - Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार' यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?

सणानिमित्त घराचे नूतनीकरण करणाऱ्यांसाठी मिक्सर, ग्राइंडर आणि नॉन-स्टिक भांड्यांवर 20% ते 30% पर्यंत सूट दिली जात आहे. तसेच, मुलांसाठी विविध प्रकारचे पतंग आणि सुरक्षित मांजाचे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी 'डीमार्ट रेडी' (DMart Ready) या ॲपचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या अॅपमुळे कोणतीही वस्तू खरेदी करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. त्यामुळे ही मकर संक्रांत सर्वांसाठी फायद्याची ठरणार आहेत. इथं वस्तूंवर दिले जाणारे रेट हे अन्य किंमतीच्या तुलनेक कमी असल्याचा दावा डी मार्टच्या वतीने करण्यात येत आहे. 

नक्की वाचा - Amaravati News: नवनीत राणांची डबल ढोलकी! भाजपच्या गडात जावून विरोधात प्रचार, बोंडे भडकले, थेट सुनावले

काय आहेत विशेष ऑफर्स?

  • तीळ-गूळ सवलत: पांढरे तीळ आणि गावरान गुळावर 20% पर्यंत सूट.
  • फराळ: चिक्की आणि लाडूंवर एकावर एक फ्री ऑफर.
  • किचन अप्लायन्सेस: नवीन मिक्सर आणि भांड्यांवर आकर्षक डील्स.
  • पतंगोत्सव: मुलांसाठी रंगीबेरंगी पतंगांची मोठी श्रेणी.

सणाच्या काळात स्टोअरमध्ये होणारी गर्दी पाहता, ग्राहकांनी सकाळी लवकर किंवा दुपारी खरेदीसाठी जाणे अधिक सोयीचे ठरेल. तसेच, जे ग्राहक स्टोअरमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी होम डिलिव्हरीचा पर्यायही खुला आहे. या ऑफर्समुळे सर्वसामान्य कुटुंबांना आपली संक्रांत अधिक उत्साहात आणि बचतीसह साजरी करता येणार आहे. त्यामुळे खरेदीला जाताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण अलिकडच्या काळात डी मार्टमध्ये गेल्यास कधी ही गर्दी असल्याचं चित्र दिसून येते. सणामध्ये तर ही गर्दी वाढते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com