जाहिरात

Rainwater: पावसाचे पाणी थेट पिऊ शकतो? 99% लोक करतात मोठी चूक, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे सत्य ऐकून बसेल धक्का

Can You Drink Rainwater: पावसाचे पाणी पिणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? पहिल्या पावसाचे पाणी का पिऊ नये आणि पावसाचे पाणी प्यायल्यास कोणते आजार होऊ शकतात, याबाबत डॉ. संजय विनायक यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला नक्की वाचा.

Rainwater: पावसाचे पाणी थेट पिऊ शकतो? 99% लोक करतात मोठी चूक, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे सत्य ऐकून बसेल धक्का
"Can You Drink Rainwater: पावसाचे पाणी थेट पिणे आरोग्यासाठी सुरक्षित असते का?"
Canva

Can You Drink Rainwater: पावसात भिजताना आपल्यापैकी अनेकांनी पावसाच्या पाण्याची चव नक्कीच घेतली असेल. पण आकाशातून पडणारे हे पाणी खरोखरच इतके शुद्ध असते का, की ते थेट प्यावे? तज्ज्ञांच्या मते पावसाचे पाणी नेहमीच पिण्यायोग्य नसते. त्यात प्रदूषण, बॅक्टेरिया, व्हायरस आणि हानिकारक कण मिसळलेले असू शकतात. चला जाणून घेऊया पावसाचे पाणी पिणे कितीपत सुरक्षित आहे? पावसात भिजून आपण हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेतो आणि कित्येकदा पावसाचे पाणी पितो. यानंतर अनेकदा लोक आजारी पडल्याचे दिसून येते. तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का, की पावसाचे पाणी थेट पिणे सुरक्षित आहे की नाही? कारण आपल्याला वाटते की हे तर नैसर्गिक पाणी आहे, त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही.

याविषयी एनडीटीव्हीने यशोदा मेडिसिटीचे वरिष्ठ सल्लागार (इंटरनल मेडिसिन) डॉ. संजय विनायक यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून जाणून घेऊया पावसाचे पाणी पिणे आरोग्यासाठी किती सुरक्षित आणि किती हानिकारक आहे?

आधी व्हिडीओ पाहा

पावसाचे पाणी पिणे खरोखरच सुरक्षित आहे का?

तसे पाहायला गेले तर पावसाचे पाणी पिण्यात वाईट बाब नाही. पण प्रत्येक वेळी पावसाचे पाणी पिण्यायोग्य नसते. जसे पाणी आकाशातून खाली पडते, तसे हवेतील धूळ-माती, प्रदूषण, हानिकारक जिवाणू आणि विषाणू त्यात मिसळतात. जर तुम्ही जास्त प्रदूषण असलेल्या परिसरात राहत असाल किंवा पाणी अशा छतावरून वाहत येत असेल जिथे पक्ष्यांची विष्ठा किंवा जड धातू (heavy metals) आहेत तर हे पाणी अमृत नाही शरीरासाठी तर विष बनते. हे प्यायल्याने तुम्ही गंभीररित्या आजारी पडू शकता.

डॉ. संजय विनायक (वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन) यांनी एनडीटीव्हीला सांगितले की -

"पावसाचे पाणी नैसर्गिक असले तरी ते नेहमीच सुरक्षित किंवा पिण्यायोग्य मानणे योग्य नाही. हवेतील प्रदूषक, धूळ, बॅक्टेरिया आणि व्हायरस पावसाच्या पाण्याला दूषित करू शकतात. त्यामुळे फिल्टर न करता किंवा न उकळता पावसाचे पाणी पिणे टाळा, विशेषतः पहिल्या पावसाचे पाणी अजिबात पिऊ नये."

पावसाचे पाणी प्यायल्याने आजारी पडू शकतो का?

डॉ. संजय यांच्या मते पावसाच्या पाण्यात धूळ, प्रदूषण, बॅक्टेरिया आणि व्हायरस मिसळलेले असू शकतात. असे पाणी फिल्टर न करता किंवा न उकळता प्यायल्याने पोटात संसर्ग, डायरिया (अतिसार), उलट्या, फुड पॉयझनिंग आणि आरोग्याशी संबंधित अन्य समस्या उद्भवू शकतात.

(नक्की वाचा: Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर या 7 गोष्टींपासून राहा दूर, डॉ मिगलानींनी दिला 'हा' इशारा)

पावसाचे पाणी पिताना या 3 चुका अजिबात करू नका:

1. थेट तोंड उघडून पाणी पिणे: जर तुम्हीही गंमत म्हणून आकाशाकडे तोंड करून थेट पावसाचे पाणी पिऊ लागता तर ही एक मोठी चूक असू शकते. पावसाच्या पाण्यात हवेतील सर्व प्रदूषण आणि आम्ल (अ‍ॅसिड) मिसळलेले असल्यामुळे ते आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

2. 'अल्कलाइन' पाण्याचा भ्रम: इंटरनेटवर अनेकजण दावा करतात की पावसाचे पाणी 'अल्कलाइन' (क्षारीय) असते आणि ते प्यायल्याने रक्ताची pH पातळी सुधारते. तर हे सत्य नाही. विज्ञान सांगते की, आपण काहीही खाल्ले किंवा प्यायलो तरी आपले शरीर रक्ताची pH पातळी नेहमी 7.4 वर स्थिर ठेवते. खरे तर पावसाचे पाणी अल्कलाइन नसून किंचित आम्लयुक्त (pH 5.0 ते 5.5) असते.

3. पाणी न उकळता साठवणे: लोक बादलीत पावसाचे पाणी साठवून ते थेट पिऊ लागतात. फिल्टर न करता आणि न उकळता ते पिणे म्हणजे पोटाच्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.

(नक्की वाचा: Rat Bite Treatment: उंदीर चावल्यावर रेबीज होतो का? कोणते इंजेक्शन घ्यावे? त्वरित करा हे उपाय, अन्यथा होईल मृत्यू)

पहिल्या पावसाचे पाणी प्यावे का?

जर तुम्हीही गंमत म्हणून पहिल्या पावसात किंवा अनेकदा पावसाचा आनंद घेण्यासाठी थेट आकाशाकडे तोंड करून पाणी पित असाल तर ही एक मोठी चूक असू शकते. पहिल्या पावसात हवेतील सर्व प्रदूषण आणि आम्ल मिसळलेले असते, कारण त्यापूर्वी हवामान स्वच्छ नसते आणि हवेतही प्रदूषण जास्त असते.

पावसाचे पाणी पिण्याचे तोटे:

  • पोटाचा संसर्ग
  • जुलाब आणि डायरिया
  • उलट्या आणि फुड पॉयझनिंग 
  • टायफॉइड आणि कॉलराचा धोका
  • 'हिपॅटायटीस ए'चा धोका
  • प्रदूषण आणि रसायनांचा प्रभाव

पावसाचे पाणी प्यायचे असेल तर काय करावे?

जर तुम्हाला पावसाचे पाणी वापरायचेच असेल, तर या गोष्टी लक्षात ठेवा:

  • पाणी  उकळणे आवश्यक: पाणी चांगले उकळल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरस मरतात, पण रसायने (केमिकल्स) स्वच्छ होत नाहीत.
  • फिल्टरचा वापर करा: जड धातू आणि रसायने काढून टाकण्यासाठी एका चांगल्या वॉटर फिल्ट्रेशन सिस्टमचा वापर करा.
  • दुसरा मार्ग निवडा: पावसाचे पाणी योग्यरित्या फिल्टर आणि स्वच्छ करू शकत नसाल, तर धोका पत्करू नका. हे पाणी पिण्याऐवजी झाडांना घालण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा आंघोळीसाठी वापरा.

थोडक्यात सांगायचे झाल्यास पावसाचे पाणी पिणे आरोग्यासाठी वाईट नाही पण ते तुमच्या नेहमीच्या फिल्टरच्या पाण्यापेक्षा जास्त फायदेशीरही नाही. पचन सुधारणे किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर पडणे, हे सर्व सामान्य स्वच्छ पाणी पिण्याचे फायदे आहेत, केवळ पावसाच्या पाण्याचे नाहीत. त्यामुळे अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि सतर्क राहा.

(डॉ. संजय विनायक, वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन, यशोदा मेडिसिटी)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com