
Father's Day 2025: आई कुटुंबाचा पाया असते तर वडील घराचे छप्पर असतात. वडिलांचे त्याग, वडिलांचे प्रेम आणि वडिलांचे कष्ट मुलांचे भविष्य घडवते. हाच बापमाणूस स्वतःसाठी वर्षभरात एखादी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतो पण आपल्या मुलांना वर्षातून 100 गोष्टी खरेदी करुन देतो. अगदी आवडीचे खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालतो, आवडीच्या ठिकाणी फिरायलाही नेतो. बहुतांश वेळेस वडील त्यांच्या मनातील भावना मोकळेपणाने मांडत नाहीत. मुलांवरील प्रेम देखील ते शब्दांत व्यक्त करत नाहीत. पण त्यांच्या कृतीतून, देहबोलीतून आभाळासारखी माया सातत्याने जाणवत असते. मुलांसाठी त्यांचे वडील सुपरहिरोच असतात. दरवर्षी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day 2025) साजरा केला जातो. यंदाही फादर्स डेला तुम्ही तुमच्या वडिलांसाठी स्पेशल प्लान आखत असाल तर ठराविक गिफ्ट्सचा (Father's Day Gifts) नक्की विचार कराल.
'फादर्स डे'साठी गिफ्ट आयडिया । Gift Ideas For Father's Day
शूज
वडिलांच्या आवडीनुसार आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही बाबांसाठी शूज खरेदी करू शकता. ऑनलाइन देखील शूज मागवू शकता किंवा वडिलांनाच शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ शकता. या बहाण्याने तुम्हा दोघांना एकत्र वेळही घालवता येईल.
ब्लूटूथ स्पीकर किंवा रेडिओ
वडिलांना ब्लूटूथ स्पीकर गिफ्ट देणे हा एक उत्तम पर्याय आहे. गाणी ऐकण्याव्यतिरिक्त बातम्या ऐकण्यास त्यांना मदत मिळेल. त्यामुळे बाबांना तुम्ही रेडिओ किंवा ब्लूटूथ स्पीकर देऊ शकता.
(नक्की वाचा: Father's Day 2025 Messages: बाबांचे प्रेम म्हणजे आभाळाएवढी माया! वडिलांना हे सुंदर मेसेज पाठवून साजरा करा खास दिवस)
हेल्दी स्नॅक्स
बाबांसाठी तुम्ही हेल्दी स्नॅक्स देखील ऑडर्र करू शकता. सुकामेवा, मखाणे, डाएट फुड खरेदी करावे.
शेविंग सेट
आणखी एक चांगला पर्याय म्हणजे शेविंग सेट. शेविंग किटमध्ये क्रीम, प्री शेविंग जेल, पोस्ट शेविंग जेल, शेविंग साबण इत्यादी गोष्टी असतात. बाबांना हे गिफ्ट केल्यास त्यांना नक्कीच आवडेल.
ट्रिमर
बाबांना स्वतःहून शेविंग करण्याची कल्पना नसेल तर तुम्ही त्यांना ट्रिमर गिफ्ट देऊ शकता. इलेक्ट्रिक ट्रिमरमुळे शेविंग करणे सोपे ठरते.
(नक्की वाचा: Happy Father's Day 2025 Wishes: जीवनाची योग्य दिशा दाखवणारे बाबा! फादर्स डेनिमित्त पाठवा खास मेजेस)
कस्टमाइज गिफ्ट्स
एखादी फोटो फ्रेम, कॅरिकेचर, ग्राफिक टीशर्ट, फोटो आर्ट इत्यादी गोष्टींचा विचार करुन तुम्ही वडिलांना कस्टमाइज गिफ्ट देऊ शकता. वडिलांसाठी एखादे ग्रीटिंग कार्ड देखील तयार करून घेऊ शकता.
परफ्युम किंवा डीओ
वडिलांसाठी एखादे चांगले परफ्युम आणि डिओ खरेदी करू शकता. कारण बाबा अशा गोष्टी स्वतःसाठी फार कमी प्रमाणात खरेदी करतात. तुम्ही त्यांना परफ्युम गिफ्ट केले तर आवडीने वापरतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world