
स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मोटोरोलाने आगामी 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2025' सेलसाठी त्यांच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये मोटोरोलाचे प्रीमियम आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. 'मोटोरोला एज 60 प्रो' पासून ते 'मोटो जी सिरीज'मधील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सपर्यंत, अनेक मॉडेल्सवर मोठी सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल 22 सप्टेंबरपासूनच सुरू होईल.
नक्की वाचा: Amazon-Flipkart Sale 2025: सर्वात कमी किमतीत वस्तू कशी खरेदी कराल? या 2 ट्रिक समजून घ्या
मोटोरोलाचा Edge 60 PRO किती रुपयांना मिळणार ?
या सेलचा सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू 'मोटोरोला एज 60 प्रो' (Motorola Edge 60 PRO) आहे. 29,999 रुपये मूळ किंमत असलेला 8+256GB व्हेरिएंट आता केवळ 24,999 रुपयांना मिळेल हा फोन अत्याधुनिक 'मोटोएआय' (motoAI) तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, यात 'पँटोन व्हॅलिडेटेड' ट्रिपल 50MP कॅमेरा सिस्टीम, 50MP अल्ट्रावाइड + मॅक्रो आणि 10MP टेलीफोटो लेन्स (3X ऑप्टिकल आणि 50X एआय सुपर झूमसह) देण्यात आली आहे. 'एज 60 प्रो' मध्ये 6.7 इंचचा 1.5K ट्रू कलर क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आहे, ज्याची ब्राइटनेस 4500nits आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एक्स्ट्रीम प्रोसेसर आणि 6000mAh च्या मोठ्या बॅटरीमुळे हा फोन दमदार परफॉर्मन्स देतो. या फोनला IP68/IP69 रेटिंग आणि MIL-810H मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी मिळाली आहे, ज्यामुळे तो अत्यंत टिकाऊ आहे.
मोटोरोला Edge 60 Fusion ही मिळणार स्वस्तात
याचबरोबर, 'मोटोरोला एज 60 फ्युजन' हा 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील एक उत्तम पर्याय आहे. 22,999 रुपये मूळ किंमत असलेला 8+256GB व्हेरिएंट आता 19,999 रुपयांना उपलब्ध होईल. यामध्ये 1.5K ट्रू कलर क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आणि 50MP 'ट्रू कलर सोनी LYTIA 700C' कॅमेरा देण्यात आला आहे.
नक्की वाचा: दीपिकाला बड्या चित्रपटातून नारळ, कोण करणार रिप्लेस?
मोटो जी96 5G मिळेल फक्त 14,999 रुपयांना
मिड-रेंज सेगमेंटमध्ये, 'मोटो जी96 5G' हा 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम फोन म्हणून उदयास आला आहे. 17,999 रुपयांऐवजी हा फोन आता फक्त 14,999 रुपयांना मिळेल. यात 144Hz रिफ्रेश रेट असलेला 6.67 इंचचा pOLED कर्व्ड डिस्प्ले आणि 50MP OIS सोनी कॅमेरा आहे. तसेच, 'मोटो जी86 पॉवर' हा फोन 6720mAh च्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीसह 15,999 रुपयांत उपलब्ध होईल. 'मोटोरोला रेझर 60' या स्टायलिश फ्लिप फोनची किंमत 49,999 रुपयांवरून 39,999 रुपये करण्यात आली आहे.या ऑफर्स बँक कार्ड्स आणि एक्सचेंज ऑफरवर आधारित आहेत. हा सेल ग्राहकांसाठी उत्तम संधी असून, यात स्मार्टफोन व्यतिरिक्त मोटोरोलाचे 'बड्स लूप' आणि 'बड्स बास' सारखे ऑडिओ डिव्हाइसेसही सवलतीच्या दरात उपलब्ध असतील असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. ANI ने याबद्दलचे वृत्त दिले आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world