Guava Benefits : हिवाळ्यामध्ये बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पेरूकडे (Guava) तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर हा लेख वाचाच! वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, पेरूमध्ये संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन C असते, ज्यामुळे तो रोगप्रतिकारशक्तीसाठी एक नैसर्गिक औषध आहे. हा साधा दिसणारा पेरू त्वचा तजेलदार ठेवतो, ब्लड शुगर नियंत्रणात आणतो, तसेच हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासूनही संरक्षण देतो. पेरूचे हे आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्ही नक्कीच त्याला तुमच्या 'सुपरफूड' डाएटमध्ये समाविष्ट कराल
चमकदार त्वचा आणि मजबूत रोगप्रतिकारशक्ती!
पेरूमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे शरीरातील कोलेजन (Collagen) निर्मितीला गती देतं. एका रिसर्चनुसार, यामुळे तुमची त्वचा टवटवीत राहते आणि सुरकुत्या उशिरा दिसायला लागतात. हाच घटक केसांच्या मुळांना मजबूत ठेवतो आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतो. नियमितपणे पेरू खाल्लास, वय वाढत असलं तरी तुमच्या शरीरातला जोश आणि त्वचेतील नैसर्गिक चमक टिकून राहते. पेरू तुम्हाला Fit आणि Younger ठेवण्यास मदत करतो.
(नक्की वाचा : Uric Acid वाढले? डॉक्टरांनी सांगितले 3 नैसर्गिक उपाय, सर्व त्रासांपासून होईल सुटका )
हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रणात!
आजकाल हृदयाशी संबंधित समस्या खूप वाढत आहेत. अशावेळी पेरू खाणे अत्यंत फायद्याचे ठरते. पेरूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम (Potassium) हे हृदयाच्या स्नायूंना मजबुती देतात. हे घटक रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवतात आणि रक्तवाहिन्यांमधील फॅट (Fat) कमी करण्यास मदत करतात.
पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते आणि रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते. परिणामी, हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोकाही कमी होतो.
कॅन्सरविरोधात नैसर्गिक संरक्षण कवच!
पेरूमध्ये असलेल्या अनेक खास घटकांमुळे तो कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासूनही सुरक्षा देतो. पेरूमध्ये ‘लायकोपीन' (Lycopene) आणि इतर शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. हे शरीरातील फ्री रॅडिकल्स (Free Radicals) नष्ट करतात.
फ्री रॅडिकल्समुळेच डीएनएचे (DNA) नुकसान होते आणि गाठी (Tumour) निर्माण होऊ शकतात. पेरूचे सेवन केल्याने शरीराला नैसर्गिक संरक्षण मिळते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. विशेषतः स्तन (Breast) आणि प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer) विरोधात पेरू जास्त प्रभावी मानला जातो.
( नक्की वाचा : Healthy Diet: एका दिवसात किती शेंगदाणे खावे? कुणी अजिबात खाऊ नये? फायदे, तोटे आणि 17 प्रश्नांची उत्तरं (FAQ) )
मधुमेही रुग्णांसाठी उत्तम
पेरू मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. पेरूच्या गरामध्ये आणि त्याच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (Fiber) असते. हे फायबर रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी हळूहळू वाढू देते, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही आणि इन्सुलिन (Insulin) संतुलित राहते.
तुुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर पेरू तुमच्या डाएटमध्ये (Diet) नक्की समाविष्ट करा, कारण फायबरमुळे भूक कमी लागते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
पचनक्रिया आणि एकूण आरोग्य
पेरू फक्त रोगप्रतिकारशक्ती किंवा हृदयासाठीच नाही, तर पचनक्रिया (Digestion) सुधारण्यासाठीही महत्त्वाचा आहे. पेरू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे कार्य सुलभ होते. हिवाळ्याच्या दिवसांत पेरूचे नियमित सेवन केल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, ज्यामुळे वृद्धत्वाची (Aging) चिन्हे दूर ठेवण्यास मदत होते.
दिसायला सामान्य वाटणारा हा पेरू आपल्या आरोग्यासाठी खूप शक्तिशाली आहे. त्याच्यातील ही मोठी ओळखल्यास तो हिवाळ्यातील तुमचा आवडता सुपरफूड (Superfood) ठरू शकतो!
( स्पष्टीकरण - ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा तसंच तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क यामधील कोणत्याही दाव्याची पृष्टी करत नाही तसंच परिणांमाना जबाबदार नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world