
Gudi Padwa 2025: चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्षाचा शुभारंभ होतो. महाराष्ट्रामध्ये या सणाला गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी घराघरामध्ये गुढी उभारुन तिची पूजा केली जाते. या दिवशी पूजा-पाठ, हवन आणि दान यासारखे शुभ कार्य केल्यास संपूर्ण वर्ष मंगलमय राहते आणि सुख-शांती-समृद्धी लाभते, असे म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यदेव, गणपती बाप्पा, लक्ष्मीमाता, दुर्गामाता आणि कुलदेवतांचे पूजन करण्यास विशेष महत्त्व असते. चला तर जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी कोणकोणते साहित्य आवश्यक असते?
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य (Gudhi Ubharnyasathi Lagnare Sahitya)
1. हळद - कुंकू, तांदूळ
2. भिजवलेली हरभरा डाळ
3. लिंबाचा फुलोरा
4. गूळ
5. आरतीचा दिवा
6. साखरेच्या गाठी
7. गुढी बांधण्यासाठी लागणारा धागा
8. विड्याची पाने - सुपारी
9. अगरबत्ती
10. फुलांचा हार
11. नवे कोरे वस्त्र किंवा साडी, ब्लाऊजचे कापड
12. चौरंग
13. कडुलिंब आणि आंब्याची डहाळी
14. वेळूची काठी
15. श्रीफळ
16. तांब्याचा तांब्या
17. रांगोळी
(नक्की वाचा: Gudi Padwa 2025: गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीचा अर्थ आणि महत्त्व काय, जाणून घ्या सविस्तर)
गुढी कशी उभारावी? (Gudhi Kashi Ubharavi)
1. गुढी उभारण्यासाठी वेळूची काठी घ्या. ती स्वच्छ धुऊन घ्यावी आणि त्यावर रेशमी कापड बांधावे.
2. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, फुलांचा हार, साखरेच्या गाठी वेळूच्या काठीवर अर्पण करावे. त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या पालथा ठेवावा.
3. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करावी.
4. गुढीभोवती सुंदर रांगोळी काढावी.
5. गुढी उभारुन फुल वाहून आणि दिवा - अगरबत्ती लावून गुढीची पूजा करावी.
6. गुढीला नैवेद्य अर्पण करावे.
(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2025 Wishes: सुखाची गुढी, आनंदाचा कळस! प्रियजनांना पाठवा गुढीपाडवा सणाच्या खास शुभेच्छा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world