जाहिरात

Guru Purnima 2025 Date: गुरुपौर्णिमा कधी आहे, 10 की 11 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि उपाय

Guru Purnima 2025 Date And Shubh Muhurat: दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीस गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे, 10 जुलै की 11 जुलै? पूजा कशी करावी? यासह सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

Guru Purnima 2025 Date: गुरुपौर्णिमा कधी आहे, 10 की 11 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि  उपाय
Guru Purnima 2025 Date And Shubh Muhurat: 10 जुलै की 11 जुलै, गुरु पौर्णिमा कधी आहे?

Guru Purnima 2025 Date And Shubh Muhurat: गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र तसेच आध्यात्मिक सण मानला जातो. 'गुरु' (Guru Purnima 2025 Date) म्हणजे जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा मार्गदर्शक. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाते. देशभरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै की 11 जुलैला आहे, यावरुन लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. गुरुपौर्णिमा कधी आहे? पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर करावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

गुरुपौर्णिमा कधी आहे? 

यंदा गुरुपौर्णिमेच्या (Guru Purnima 2025 Tithi) तिथीस 10 जुलैला मध्यरात्री 1.36 (AM) वाजता शुभारंभ होणार असून 11 जुलैला उशीरा रात्री 2.06 (AM) वाजता तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार यंदा 10 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येईल. 

गुरुपौर्णिमा कधीपासून साजरी होऊ लागली?

मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा या नावानेही ओळखला जातो.  

Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय! समाजात मानसन्मान वाढेल आणि कामात होईल प्रगती

(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय! समाजात मानसन्मान वाढेल आणि कामात होईल प्रगती)

गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त (Guru Purnima 2025 Shubh Muhurat)

  • ब्रह्म मुहूर्त (Brahma Muhurat) : पहाटे 4.10 वाजेपासून ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत असेल.  
  • अभिजीत मुहूर्त (Abhijit Muhurat) : सकाळी 11.59 वाजेपासून ते दुपारी 12.54 वाजेपर्यंत असेल. 
  • विजय मुहूर्त (Vijay Muhurat) : दुपारी 12.45 वाजेपासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत असेल. 
  •  गोधूलि मुहूर्त (Godhuli Muhurat) : संध्याकाळी 7.21 वाजेपासून ते संध्याकाळी 7.41 वाजेपर्यंत असेल.  

गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी? (Guru Purnima 2025 Puja Vidhi)

  • पहाटे उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • आपल्या गुरुंचा आशीर्वाद घ्यावा. 
  • घरातील देवांची पूजा करावी. 
  • चौरंग स्वच्छ करुन गुरूचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करा. 
  • पूजेसाठी फुले, धूप, तुपाचा दिवा, गंगाजल, नैवेद्य, हळदकुंकू, अगरबत्ती अशा सामग्रीचा समावेश करावा. 
  • गुरुच्या प्रतिमेची पूजा करावी. गुरुमंत्रांचा जप करावा.
  • आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.

Guru Purnima 2025 Date And Time: गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व

(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Date And Time: गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व)

गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय

ज्योतिषशास्त्रज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी सांगितलेले उपाय जाणून घेऊया... 

  • घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असल्यास मूर्तीला गाईच्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करावा.
  • घरातील देवांना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पिवळ्या रंगाच्या गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. 
  • शक्य असल्यास गरजवंतांना पिवळ्या रंगाची वस्तू दान करावी. उदाहरणार्थ केळी, पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, इत्यादी. 
  • वयोवृद्धांची मदत करावी. आईवडील तसेच शिक्षकांचे आशीर्वाद घ्यावे.
  • गुरूबळ वाढल्यास आपल्या कष्टाला नशीबाची साथ मिळण्यास मदत होते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com