
आजच्या धावपळीच्या जीवनात केस गळणे, केस अकाली पांढरे होणे किंवा केसांचे नुकसान होणे अशा अनेक समस्यांचा सामना लोकांना करावा लागत आहे. या समस्यांमागे प्रदूषण, चुकीचा आहार आणि शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक तत्वांची (Nutrients) कमतरता ही मुख्य कारणे आहेत. हेल्थ एक्सपर्ट डॉ. सलीम यांनी 'हेल्दी हमेशा' या त्यांच्या वाहिनीवर केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या 6 पोषक तत्वांची माहिती दिली आहे.
केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक 6 न्यूट्रिएंट्स
डॉ. सलीम यांच्या मते, आहारात या सहा गोष्टींची कमतरता असल्यास केस गळती वाढू शकते:
प्रोटीन:
केसांचे फॉलिकल्स मुख्यतः कॅरोटीन नावाच्या प्रथिनांपासून बनलेले असतात. प्रथिनांची कमतरता झाल्यास केस पातळ आणि कमकुवत होतात.
आहार:
नाश्त्याला 2-4 उकडलेली अंडी, दुपारच्या जेवणात मिश्र डाळी किंवा मांसाहार करणारे 200-250 ग्रॅम ग्रील्ड चिकन/मासे खाऊ शकतात.
लोह (Iron):
शरीरात लोहाची कमतरता हे देखील केस गळतीचे प्रमुख कारण आहे.
आहार:
बीट , पालक आणि डाळिंब यांचे ज्यूस, सॅलड किंवा भाज्यांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन C:
हे कोलेजनच्या उत्पादनासाठी आणि लोहाच्या शोषणासाठी महत्त्वाचे आहे.
आहार:
मोसंबी, संत्री, लिंबू यांसारखी आंबट फळे (Citrus Fruits) आणि आवळा (ज्यूस, चूर्ण किंवा मुराब्बा) खाणे फायदेशीर आहे.
बायोटिन (Biotin):
केसांच्या वाढीसाठी हे एक आवश्यक व्हिटॅमिन आहे.
आहार:
संपूर्ण धान्य (Whole Grains), मांसाहार आणि 25-50 ग्रॅम भिजवलेले बदाम रोज खा.
झिंक (Zinc):
केसांची वाढ आणि दुरुस्तीसाठी झिंक महत्त्वाचे आहे.
आहार:
विविध प्रकारच्या डाळी, भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) आणि रेड मीट खावे.
व्हिटॅमिन A:
याची कमतरता झाल्यास केस कोरडे (Dry) आणि निर्जीव (Lifeless) होतात.
आहार:
गाजर, पालक (भाजी किंवा सूप), आणि रताळे (शकरकंदी) खाणे उपयुक्त ठरते.
आहारासोबत इतर काळजी:
केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केवळ आहारच नाही, तर तणावाचे व्यवस्थापन (Stress Management), पुरेशी झोप (Adequate Sleep) आणि संपूर्ण आरोग्य जपण्याची गरज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world