जाहिरात

Health News: टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे? जास्त वेळ बसल्यास शरीराचे काय नुकसान होऊ शकते?

Health News: टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यास कोणते नुकसान होऊ शकतात, याबाबत माहिती देणारा व्हिडीओ डाएटिशियन श्रेया गोयल यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलाय.

Health News: टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे? जास्त वेळ बसल्यास शरीराचे काय नुकसान होऊ शकते?
"Health News: टॉयलेटमध्ये जास्त वेळ का बसू नये?"
Canva

Why Sitting on the Toilet Too Long Can Be Harmful: टॉयलेटमध्ये बसून फोन पाहणं हल्ली सामान्य बाब आहे. काही लोक 20-25 मिनिटे कमोडवर बसून राहतात, पण तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? याबाबत माहिती सांगणारा व्हिडीओ श्रेया गोयल यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलाय. टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यास कोणते नुकसान होऊ शकतात, याबाबत त्यांनी माहिती दिलीय. 

टॉयलेटमध्ये जास्त वेळ का बसू नये?

डाएटीशियनने सांगितलेल्या माहितीनुसार, आतड्यांची योग्य पद्धतीने हालचाल काही मिनिटांत होणे गरजेचं आहे. साधारणतः पाच ते 10 मिनिटे पुरेसे आहेत. 10-15 मिनिटांहून जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसणं योग्य मानले जात नाही. कमोडवर जास्त वेळ बसून राहिल्यास किंवा जास्त ताण घेतल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. जास्त वेळ बसून राहिल्याने गुदाशयाच्या भागावर दाब वाढतो, ज्यामुळे मूळव्याध, गुदद्वारात भेगा पडणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

टॉयलेटमध्ये फोन का घेऊन जाऊ नये?

सर्वात मोठी चूक म्हणजे टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणे. फोन स्क्रॉल करत-करत आपण आवश्यकतेपेक्षा जास्त काळ कमोडवर बसतो. यामुळे हळूहळू आतड्यांवर वाईट परिणाम होतात, ज्यामुळे नैसर्गिकरित्या मलत्याग करताना अडथळे निर्माण होतात. तसेच याव्यतिरिक्त टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यास गुदाशयाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे त्या भागातील वेदना कायम राहतात.  

स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं हानिकारक ठरू शकते. कारण बाथरूममधील बॅक्टेरिया, जंतू फोनवर चिकटतात आणि हाच फोन आपण बिछाना, डायनिंग टेबलवरही ठेवतो. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो.  

त्यामुळे टॉयलेटचा वापर आराम करण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी करू नये. फोन बाहेर बाहेर ठेवा, शरीरावर जास्त ताण येऊ देऊ नका. वारंवार बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Health News: खोकला किंवा शिंकल्यानंतर लघवी बाहेर येते? रोज 10 मिनिटे करा या आसनाचा सराव, समस्या होईल दूर

(नक्की वाचा: Health News: खोकला किंवा शिंकल्यानंतर लघवी बाहेर येते? रोज 10 मिनिटे करा या आसनाचा सराव, समस्या होईल दूर)

UTI Prevention Tips: वारंवार युरिन इन्फेक्शन होतंय? या 8 वाईट गोष्टी आहेत कारणीभूत, UTIपासून कसा करावा बचाव?

(नक्की वाचा: UTI Prevention Tips: वारंवार युरिन इन्फेक्शन होतंय? या 8 वाईट गोष्टी आहेत कारणीभूत, UTIपासून कसा करावा बचाव?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com