जाहिरात

Orange Benefits: रोज 1 संत्रं खाल्ल्यास काय होईल? संत्रं खाण्याची योग्य वेळ कोणती?

Orange Benefits: नियमित संत्रं खाल्ल्यास शरीराला कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Orange Benefits: रोज 1 संत्रं खाल्ल्यास काय होईल? संत्रं खाण्याची योग्य वेळ कोणती?
"Orange Benefits : रोज एक संत्रं खाण्याचे फायदे"

Orange Benefits: संत्र्याची केवळ चवच चांगली नसते तर या फळामध्ये आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्मांचाही खजिना आहे. संत्र्यामध्ये  व्हिटॅमिन सी, फायबर, खनिज या गुणधर्मांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे शरीर आतील बाजूने मजबूत होण्यास मदत मिळते. संत्र्याच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि चेहऱ्यावर तेजही येते. रोज एक संत्रं खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकला, संसर्ग आणि थकवा यासारख्या समस्यांपासून सुटका होईल. रिकाम्या पोटी ग्लासभर संत्र्याचा रस प्यायल्यास यकृत आणि किडनी डिटॉक्स होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील.

संत्रं खाण्याचे फायदे (Orange Benefits In Marathi)

हृदयासाठी फायदेशीर

संत्र्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर हे गुणधर्म आहेत, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पचनप्रक्रियेचे कार्य देखील सुधारते. गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.  

त्वचेसाठी फायदेशीर 

संत्र्याचे ज्युस आणि साल दोन्हीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे. संत्र्याच्या सालीपासून पावडर तयार करुन चेहऱ्यावर पेस्ट लावल्यास पिंपल्सपासून सुटका मिळेल आणि त्वचेवर तेजही येईल. संत्र्यांतील पोषणतत्त्वांमुळे रक्तशुद्धी देखील होते.  

Detox Drink Benefits: वेटलॉसपासून ते सुंदर त्वचेपर्यंत मिळतील असंख्य फायदे, 4 गोष्टींपासून तयार करा डिटॉक्स ड्रिंक

(नक्की वाचा: Detox Drink Benefits: वेटलॉसपासून ते सुंदर त्वचेपर्यंत मिळतील असंख्य फायदे, 4 गोष्टींपासून तयार करा डिटॉक्स ड्रिंक)

डोळ्यांसाठी फायदेशीर

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे दृष्टी सुधारते. यामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम देखील आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

कॅन्सर आणि संसर्गापासून होतो बचाव

संत्र्याचा सुगंधच एक नैसर्गिक थेरपी आहे. यामुळे तणाव, चिंता आणि थकवा यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त संत्र्यातील फ्लेव्होनॉइड्स - लिमोनोइड्स हेतत्त्व शरीराचा कॅन्सर आणि संसर्गापासून बचाव करतात. 

संत्रं खाण्याची योग्य वेळ
  • सकाळी किंवा दुपारच्या वेळेस संत्रं खाऊ शकता.  

  • संत्र्याचा ज्युस देखील पिऊ शकता. 
  • दूध किंवा दह्यासोबत संत्रं खाणे टाळावे.

Urinary Tract Infection Causes: लघवी करताना जळजळ होते, वारंवार पण थोडीच लघवी होते?  वाचा उपाय आयुर्वेदिक उपाय

(नक्की वाचा: Urinary Tract Infection Causes: लघवी करताना जळजळ होते, वारंवार पण थोडीच लघवी होते? वाचा उपाय आयुर्वेदिक उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com