जाहिरात

Morning Routine for Weight Loss: वेट लॉससाठी रोज सकाळी करा या 6 गोष्टी, काही दिवसांतच व्हाल सडपातळ

Morning Routine For Weight Loss: सकाळी उठल्यानंतर सहा गोष्टी केल्यास तुमच्या शरीरामध्ये कोणते बदल घडतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Morning Routine for Weight Loss: वेट लॉससाठी रोज सकाळी करा या 6 गोष्टी, काही दिवसांतच व्हाल सडपातळ
"Morning Routine For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सकाळी या सहा गोष्टी करा"
Canva

Weight Loss Morning Routine: मानसिक ताण आणि चिंताग्रस्त जीवनामुळे शरीराचे वजन वाढण्याच्या समस्येमुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. एकाच ठिकाणी बसून तास-न्-तास काम करणं, शारीरिक हालचाली कमी प्रमाणात होणे यासारख्या गोष्टींमुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. कित्येक लोक वजन कमी करण्यासाठी डाएट-व्यायाम ते घरगुती उपाय अशा सर्व गोष्टी करून पाहतात. पण काही केल्या वजन कमी होत नाही. याऐवजी सकाळच्या काही सवयी बदलल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत मिळू शकते.  

सकाळी उठल्यानंतर सहा गोष्टी करा फॉलो | Weight Loss Morning Routine

1. प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट 

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये तेलकट-तिखट पदार्थांऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, यामुळे जास्त प्रमाणात भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

2. जास्त प्रमाणात पाणी प्यावे

वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार,पाणी प्यायल्यास भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.  

3. वजन तपासून पाहा

रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःचे वजन तपासून पाहा. यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण येण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Lavang Benefits: रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होतं? 1 दिवसात किती लवंग खावी? न्युट्रिशनिस्टने सांगितली माहिती)

4. कोवळे ऊन

सकाळी उठल्यानंतर काही वेळासाठी कोवळ्या उन्हात बसा, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते;असे म्हणतात. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात काही वेळ राहिल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि व्हिटॅमिन डीची कमतरता देखील भरुन निघण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Glowing Skin Tips: बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू... कोणत्या सुकामेव्यामुळे चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो?)

5. पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी

खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि नियमित व्यायाम करण्यासह रोज पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. रोज कमीत कमी आठ तास झोपणे आवश्यक आहे.

6. सकाळी उठल्यानंतर शारीरिक व्यायाम करावा 

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा, वजन कमी करण्यासाठी हा प्रभावी उपाय मानला जातो. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com